Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

मद्यपी मोटारचालकाकडून पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की

मद्यपी मोटारचालकाकडून पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की

धक्काबु्क्की केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मद्यपी मोटार चालकाने रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याची घटना मुंढवा भागात घडली. या प्रकणी मोटार चालकाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, तसेच धक्काबु्क्की केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकणी मोटार चालक प्रज्ज्वल सोमनाथ म्हस्के (वय २७, सध्या रा. शिक्रापूर, ता. शिरुर, जि. पुणे, मूळ रा. पानमंद वस्ती, म्हस्केवाडी, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस कर्मचारी प्रशांत नायडू यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फुकट पेट्रोल देण्यास नकार दिल्याने मारहाण; दोघे अटकेत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ मे रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास मोटार चालक म्हस्के मुंढव्यातील रेल्वे उड्डाणपुलावरुन निघाला होता. लोणकर वजनकाट्याजवळ भरघाव मोटारीने एका ट्रकला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच रात्रपाळीत गस्त घालणारे पोलीस कर्मचारी प्रशांत नायडू तेथे गेले. मोटार चालकाने नायडू यांना शिवीगाळ केली. ‘तुम्ही पोलीस विकले गेले आहेत. बलात्कार होतो. तुम्ही तेथे जात नाहीत. आम्हाला त्रास देता’, असे सांगून नायडू यांना धक्काबुक्की केली. नायडू यांच्याकडील मोबाइल संच घेऊन त्याने जमिनीवर आपटला. मोटार चालकाने मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मोटार चालकाला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. शासकीय कामात अडथळा आणणे, तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक सुरवसे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×