Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

फुकट पेट्रोल देण्यास नकार दिल्याने मारहाण; दोघे अटकेत

मद्य विक्री दुकानातील कामगाराला मारहाण

लोणी काळभोर भागातील घटना

marathinews24.com

पुणे – पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी फुकट पेट्रोल भरण्यास नकार दिल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना लोणी काळभोर भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. राज पवार, प्रेम गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदाराविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पेट्रोल पंपावरील व्यवस्थापक प्रतीक सोळुंके (वय २१) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात ऍसिड टाकून वाहनांचे नुकसान – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवार, गायकवाड आणि साथीदार हे १६ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरील कदमवाक वस्ती परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर आले. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून शिवीगाळ केली. ‘आम्ही या भागातील भाई आहोत. दुचाकीच्या टाकीत पेट्रोल भर. पैसे देणार नाही’, असे सांगून आरोपींनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली. पेट्रोलचे पैसे न देता आरोपी पसार झाले. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, पोलीस उपनिीरक्षक सोनटक्के तपास करत आहेत.

एनआयबीएम संस्थेच्या आवारातील बंगल्यात आग

कोंढव्यातील नॅशनल इन्सिट्यूट ऑफ बँकिंग अँड मॅनेजमेट (एनआयबीएम) संस्थेच्य आवारातील बंगल्यात पहाटे आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

‘एनआयबीएम’ संस्थेच्या आवारात अधिकाऱ्यांसाठी बंगले बांधण्यात आले आहे. संस्थेचे आवार विस्तीर्ण असून, आवारात सेवक वसाहत आहेत. पहाटे चारच्या सुमारास एका बंगल्यात आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या कोंढवा केंद्राला कळविण्यात आली. अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. जवान स्वप्नील कामठे, सागर दळवी, नीलेश वाखडे, हर्षद येवले, हर्ष खाडे, संदीप कवडे यांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. बंगल्यातील शयनगृहातील साहित्य जळाले. बंगल्यात कोणी राहत नसल्याने गंभीर दुर्घटना टळली, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×