Breking News
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्नजणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगहसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ – मकरंद टिल्लूतपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा -आमदार रोहित पवार

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम: पुणे महानगरपालिकेचा राज्यात द्वितीय क्रमांक

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम: पुणे महानगरपालिकेचा राज्यात द्वितीय क्रमांक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) पवनीत कौर यांनी स्वीकारला पुरस्कार

marathinews24.com

पुणे – मुख्यमंत्री यांच्या १५० दिवस ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत झालेल्या स्पर्धेत २९ महापालिकांच्या झालेल्या मूल्यमापनात पुणे महानगरपालिकेचा २०० पैकी १८६.२५ गुण मिळवून द्वितीय क्रमांक आला आहे.

सोलापूर जिल्हा परिषद सेवाकर्मी कार्यक्रमात राज्यात आदर्श ठरली – सविस्तर बातमी 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि मा. माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) पवनीत कौर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

१५० दिवस ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत पुणे महानगरपालिकेने महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त(ज) पवनीत कौर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) पृथ्वीराज बी. पी., मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त(विशेष) ओमप्रकाश दिवटे यांच्या नेतृत्वामध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच ऑनलाइन सेवा पोर्टल, तक्रारींचे विश्लेषण व व्यवस्थापन, व्हॉटसअॅप यांचा सेवा, तक्रार निवारण, माहिती उपलब्ध करून देणे यासाठी नागरिकाभिमुख वापर करण्यात येत आहे. पालिकेच्या वतीने AI व GIS आधारित प्रकल्पांचा व तंत्रज्ञानाचा विविध प्रकल्पांमध्ये वापर सुरु करण्यात आला आहे. सदर उपक्रम राबविण्यासाठी महापालिकेतील सर्व विभागामार्फत कामकाज करण्यात आले तसेच माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख राहुल जगताप यांच्या विभागामार्फत या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषदतर्फे करण्यात आले. त्यामध्ये पुणे महानगरपालिकेने मिळवलेल्या उज्ज्वल यशामुळे महापालिकेचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×