Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

ई-गव्हर्नन्समध्ये उत्कृष्ट कामगिरी; क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे राज्यात सातव्या क्रमांकावर

ई-गव्हर्नन्समध्ये उत्कृष्ट कामगिरी; क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे राज्यात सातव्या क्रमांकावर

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची प्रभावी अंमलबजावणी ठरली ठळक वैशिष्ट्य; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते क्रीडा आयुक्त श्रीमती शीतल तेली-उगले यांचा गौरव

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र शासनाच्या ‘१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे या कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात सातवा क्रमांक मिळविला आहे. विशेष म्हणजे, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची प्रभावी अंमलबजावणी हे या यशाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले आहे. या उत्कृष्ट कार्याबद्दल आयुक्त श्रीमती शीतल तेली-उगले व त्यांच्या चमूचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम: पुणे महानगरपालिकेचा राज्यात द्वितीय क्रमांक – सविस्तर बातमी 

राज्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये ई-गव्हर्नन्स प्रणाली अधिक प्रभावी, पारदर्शक व तंत्रज्ञानाधिष्ठित करण्याच्या उद्देशाने हा १५० दिवसांचा विशेष कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत कार्यालयांचे संकेतस्थळ, ‘आपले सरकार’ प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेन तंत्रज्ञान तसेच भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) या सात घटकांवर आधारित मूल्यमापन करण्यात आले.

दोन टप्प्यांत पार पडलेल्या या मूल्यमापन प्रक्रियेत राज्यातील ६८ आयुक्तालये व संचालनालयांचा समावेश होता. त्यामध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांनी AI आधारित सेवा सुलभीकरण, डेटा पारदर्शकता वाढविणारे ब्लॉकचेन उपाय आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या जोरावर सातवा क्रमांक मिळवून राज्यस्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली.

या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र प्रदान करून आयुक्त शीतल तेली-उगले व त्यांच्या टीमचा सन्मान करण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×