Breking News
Jyoti Savitri School Khanwadi : महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे विशेष : परिवर्तनाचा नवा दीप : ‘ज्योती सावित्री’ शाळा!Birsa Munda Seva Saptah 2026 : भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहातून आदिवासी बांधवांना योजनांचा लाभMahajyoti Pune News : महाज्योतीच्या ५१ विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी भरारी!Wagholi Traffic News : वाघोली-लोहगाव चौक रस्त्यावर एकेरी वाहतूकPune Road Accident News : पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यूSavitri Umed Mall Pune : सावित्री-उमेद मॉल’मधून ग्रामीण महिला उद्योजकतेला मिळणार नवी दिशाKhed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्या

कृतज्ञ भावनेची जोड देत प्रसाद नगरकर यांनी आई-वडिलांना भेट दिली आलिशान ‘मर्सिडीज-मेबॅक’

प्रसाद नगरकर यांच्या भावनिक कृतीची सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर चर्चा

marathinews24.com

पुणे – आजच्या स्पर्धात्मक आणि धावपळीच्या जीवनात यशाचे प्रदर्शन अनेकदा वैयक्तिक सुखसोयींमध्ये दिसून येते. मात्र पुण्यातील उद्योजक प्रसाद नगरकर यांनी आपल्या यशाला वेगळीच अर्थपूर्ण दिशा देत आई-वडिलांना आलिशान मर्सिडीज-मेबॅक मोटार भेट देऊन कृतज्ञतेचा आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या भावनिक कृतीची सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.

नागरिकांना ऑनलाईन सेवा विहीत वेळेत उपलब्ध करुन द्याव्यात-पुणे विभागाचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग – सविस्तर बातमी

ही केवळ महागडी गाडी खरेदी करण्याची घटना नाही, तर आपल्या आयुष्याच्या प्रवासात खंबीरपणे साथ देणाऱ्या आई-वडिलांप्रती असलेली कृतज्ञतेची भावना असल्याचे प्रांजळ मत प्रसाद नगरकर यांनी व्यक्त केले. बालपणापासून पाहिलेले स्वप्न पूर्ण करताना त्यांनी आपल्या आई-वडिलांनाच सर्वस्व मानून हा सन्मान दिला.

जागतिक स्तरावर आलिशान आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या मर्सिडीज-मेबॅककडे नगरकर यांनी केवळ ऐश्वर्य म्हणून पाहिले नाही. आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यांतील आनंद, अभिमान आणि समाधान हेच खरे यश असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. व्यावसायिक यशापेक्षा कुटुंबासोबत वाटलेला आनंद अधिक महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

विशेष म्हणजे ही भेट त्यांनी स्वतःच्या कमाईतून दिली आहे. त्यामुळे स्वावलंबन, जबाबदारी आणि कुटुंबाप्रती असलेली बांधिलकी यांचे उदाहरण म्हणूनही या घटनेकडे पाहिले जात आहे. स्वतःच्या यशाचा उत्सव कुटुंबासोबत साजरा करण्याची त्यांची भूमिका अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

आई-वडिलांचा सन्मान करत प्रसाद नगरकर यांनी केवळ स्वतःचे स्वप्न पूर्ण केले नाही, तर यशाची व्याख्या अधिक संवेदनशील आणि मूल्याधिष्ठित असू शकते, हा संदेशही समाजासमोर ठेवला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×