Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

नागरिकांना ऑनलाईन सेवा विहीत वेळेत उपलब्ध करुन द्याव्यात

पुणे विभागाचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अन्वये नागरिकांना ऑनलाईन सेवा विहीत वेळेमध्ये पारदर्शकपणे उपलब्ध करुन देण्यात याव्यात; या सेवा नागरिकांना घरपोच देण्याबाबत कार्यवाही करावी अशा सूचना राज्य लोकसेवा आयोगाच्या पुणे विभागाचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी दिल्या.

सिंधुदुर्गात देशातील पहिले अंडरवॉटर म्युझियम साकार; ‘एक्स-आयएनएस गुलदार’मुळे महाराष्ट्र सागरी पर्यटनात जागतिक नकाशावर -पर्यटनमंत्री शंभूराज देसाई – सविस्तर बातमी

उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी बारामती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हणुमंत पाटील, उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार स्वप्नील रावडे, गट विकास अधिकारी किशोर माने, नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, आदी उपस्थित होते.

तेलंग म्हणाले, महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना राज्यशासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक, गतिमान व कालबध्द पद्धतीने देण्याकरीता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ पारित करण्यात आला आहे. त्यानुसार या कायद्यान्वये पुरविण्यात येणा-या सर्व सेवा सुविधांची प्रभावी अंमलबजावणी करावी. अधिनियमांच्या अनुषंगाने पारदर्शकता, उत्तरदायित्व, कालबध्द सेवा, कार्यक्षम सेवा, माहिती तंत्रज्ञानाचा वापर व ई-प्रशासन संस्कृतीचा अवलंब करणे याबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

बारामती तालुक्यामध्ये एकूण १४७ इतके महा ई-सेवा व आपले सरकार सेवा केंद्र आहेत. यापैकी किमान ५ आदर्श आपले सरकार सेवा ग्रामपंचायत व आपले सरकार सेवा केंद्र तयार करावेत. तसेच सर्व महा ई-सेवा व आपले सरकार केंद्रांकरिता सेवा-सुविधाबाबतचे प्रशिक्षण लवकरच आयोजित करणेत येईल, असेही श्री. तेलंग म्हणाले.

तेलंग यांनी मौजे माळेगाव बु. येथील महा ई-सेवा केंद्राची पाहणी केली. यावेळी तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×