Breking News
भटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; कारवाईची मागणीउपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देशविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावामहाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे २२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन – शेखर मुंदडाबीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; केजमध्ये विशाल डेअरीवर धाडरिक्षा चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अटकदुचाकी मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याबाबत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात‘दगडूशेठ’ गणपती यंदा गणेशोत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिरात होणार विराजमाननशामुक्त भारत अभियानाचा सामाजिक न्याय भवन येथे शुभारंभआंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश, २० गुन्हे उघडकीस

सिंधुदुर्गात देशातील पहिले अंडरवॉटर म्युझियम साकार

‘एक्स-आयएनएस गुलदार’मुळे महाराष्ट्र सागरी पर्यटनात जागतिक नकाशावर – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

marathinews24.com

मुंबई – महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक परिसरात भारतीय नौदलाची सेवानिवृत्त युद्धनौका “एक्स-आयएनएस गुलदार” समुद्रतळावर यशस्वीरित्या स्थापित करण्यात आली असून, देशातील अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि वैशिष्ट्यपूर्ण पाणबुडी पर्यटन प्रकल्प साकार होत आहे. मे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या समन्वयाने राबविण्यात येणारा हा प्रकल्प भारतीय पर्यटन क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले असून हा प्रकल्प जागतिक स्तरावर सागरी पर्यटन आकर्षण म्हणून उदयास येणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

समाज कल्याण विभागाच्या विविध योजना वंचितांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासकीय विभागांनी कार्यवाही करावी – सविस्तर बातमी

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, भारतातील पहिल्या एकात्मिक सबमरीनव्दारे अनुभवात्मक पर्यटनाची सुरवात होत असून या पर्यटन स्थळामध्ये मार्गदर्शित व्रेक डायव्हिंग व सबमरीन अनुभव,डिस्कव्हर स्कुबा डायव्हिंग (12 मीटरपर्यंत),प्रमाणित डायव्हर मोहिमा (18 मीटरपर्यंत), अॅडव्हान्स डायव्हिंग अनुभव (30 मीटरपर्यंत),अंडरवॉटर फोटोग्राफी पर्यटन,सागरी शिक्षण व संशोधन करता येणार आहे. डायव्हिंग स्लॉट्स, सबमरीन बुकिंग आणि पर्यटक सुविधांबाबतची माहिती लवकरच एमटीडीसीच्या अधिकृत माध्यमांतून जाहीर करण्यात येईल,

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती प्राप्त झाली असून राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे सहकार्य, पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव, संजय खंदारे आणि एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे (भाप्रसे) यांच्या प्रयत्नांतून या प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात येत आहेृ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पर्यटन मंत्रालय, भारत सरकारच्या जागतिक दर्जावर आयकॉनिक पर्यटन केंद्रांचा विकास “भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य (SASCI) या योजनेतंर्गत एमटीडीसी मार्फत विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने रु.46.91 कोटी तर महाराष्ट्र शासनाने ₹112.46 कोटी इतक्या रक्कमेस मंजुरी दिली आहे.

एक्स-आयएनएस गुलदार ही भारतीय नौदलातील “मगर” वर्गातील लँडिंग शिप टँक (LST) प्रकारातील युद्धनौका असून तिने तब्बल 39 वर्षे राष्ट्रसेवा बजावून दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी भारतीय नौदलामधून निवृत्त झाली. पोलंडमधील ग्डिनिया शिपयार्ड येथे दि.30 डिसेंबर 1985 रोजी नौकेचे उद्घाटन झाले होते. 83.9 मीटर लांबीची ही नौका उभयचर युद्धकारवाई, सैनिक व रसद वाहतूक, किनारी सुरक्षा तसेच विविध नौदल सराव मोहिमांमध्ये कार्यरत होती. मे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL), मुंबई यांच्या माध्यमातून दिनांक 19 मे 2026 रोजी सिंधुदुर्ग किनाऱ्यावरील निवती रॉक परिसरात सुमारे 22 मीटर खोलीवर नौका समुद्रतळावर स्थापित करण्यात आले. या स्थळाची निवड महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था यांच्या सविस्तर वैज्ञानिक अभ्यासानंतर करण्यात आली असून परिसरात नैसर्गिक प्रवाळभित्ती नसल्याचे तसेच विपरित पर्यावरणीय परिणाम नसल्याचे प्रमाणीत झाले आहे असेही मंत्री देसाई असे म्हणाले.

स्कटलिंगपूर्वी नौकेची पर्यावरणीय स्वच्छता करण्यात आलेली असून एक्स-आयएनएस गुलदारची मजबूत पोलादी रचना आता कृत्रिम प्रवाळभिंत्ती म्हणून कार्य करणार असून त्यामुळे समुद्री जैवविविधता, प्रवाळ वाढ, मासेमारी संसाधने आणि पर्यावरणीय संतुलनास चालना मिळणार आहे.या प्रकलामध्ये जेट्टीवरुन स्पीडबोट द्वारे निवती रॉक येथे पोहोचणे व तेथील बार्जवर उतरुन पाणबुडी किंवा स्कूबा व्दारे जहाजामधील प्रवाळ, मत्स्य पाहणी करणे अपेक्षित आहे.

प्रकल्पामुळे होणारे बहुआयामी परिणाम

या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टीतील पर्यटन अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. देश-विदेशातील पर्यटकांच्या वाढत्या आगमनामुळे स्थानिक व्यवसाय, निवास व्यवस्था, वाहतूक, खाद्यव्यवसाय आणि पर्यटन सेवांमध्ये आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होणार आहे. दीर्घकालीन दृष्टीकोनातून हा प्रकल्प स्थानिक आर्थिक विकासासाठी व स्थानिक रोजगारासाठी, पूरक व्यवसायासाठी महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहे.

एक्स-आयएनएस गुलदार प्रकल्पामुळे महाराष्ट्रात प्रथमच जागतिक दर्जाचा पाणबुडी पर्यटन अनुभव विकसित होत आहे. साहसी पर्यटन, स्कुबा डायव्हिंग, अंडरवॉटर एक्सप्लोरेशन आणि सागरी पर्यटन क्षेत्राला नवे परिमाण प्राप्त होणार असून महाराष्ट्राची ओळख देशातील अग्रगण्य साहसी पर्यटन स्थळ म्हणून निर्माण होण्यास मदत होणार आहे. समुद्रतळावर स्थापित करण्यात आलेली युद्धनौका कालांतराने कृत्रिम प्रवाळभित्ती (Artificial Reef) म्हणून विकसित होणार असून त्यामुळे सागरी जैवविविधतेला पोषक वातावरण निर्माण होईल. विविध प्रकारचे मासे, सागरी वनस्पती आणि सूक्ष्म जीवांसाठी हे संरक्षित अधिवास (Habitat) ठरणार आहे.

भारतीय नौदलाच्या सेवेत कार्यरत राहिलेल्या युद्धनौकेचा पर्यावरणपूरक व पर्यटनाभिमुख पद्धतीने पुनर्वापर करण्यात येत असून हा उपक्रम राष्ट्रसेवेतील ऐतिहासिक वारशाला अभिवादन करणारा आहे. या माध्यमातून नौदलाचा गौरवशाली इतिहास आणि सागरी वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यात मदत होणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राला नाविन्यपूर्ण आणि शाश्वत पर्यटन प्रकल्प राबविणाऱ्या अग्रगण्य राज्यांमध्ये स्थान मिळवून देणार आहे. तसेच भारताच्या सागरी पर्यटन क्षमतेची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी ओळख निर्माण करण्यास मदत होणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र व भारताची शाश्वत व नाविन्यपूर्ण पर्यटन क्षेत्रातील जागतिक ओळख अधिक मजबूत करणार आहे.

फ्लोरिडा (अमेरिका) येथील युएसएस ऑरिस्कनी आणि ऑस्ट्रेलियातील एचएमएएस स्वॅन यांसारख्या जागतिक दर्जाच्या व्रेक डायव्हिंग स्थळांपासून प्रेरणा घेत विकसित करण्यात आलेला आहे. हा प्रकल्प भारतातील पहिला जागतिक स्तरावरील अंडरवॉटर म्युझियम आणि कृत्रिम प्रवाळभित्ती पर्यटन उपक्रम ठरणार आहे.MTDC तर्फे देश-विदेशातील पर्यटक, स्कुबा डायव्हर्स, सागरी अभ्यासक, विद्यार्थी, छायाचित्रकार व संशोधकांना या अद्वितीय अंडरवॉटर पर्यटन अनुभवासाठी निमंत्रित करण्यात येत आहे. अशी बाब महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी स्पष्ट केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×