Breking News
पुण्यात पार्किंगमध्ये गाडी लावताना तरुणावर गोळीबार, तिघांना अटकदातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी; एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादनकसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडीपुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरारश्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष! हर्षवर्धन फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात कलाकारांची मांदियाळीशेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारराज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा – महापौरसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा; महापौर मंजूषा नागपुरेमहिला पोलिसांसाठी स्वतंत्र समुपदेशन व मदत यंत्रणा उभारावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुण्यातील 3 हजार 600 कोंटीच्‍या ड्रग प्रकरणात सुत्रधाराचे प्रत्‍यारोपण

पुण्यातील 3 हजार 600 कोंटीच्‍या ड्रग प्रकरणात सुत्रधाराचे प्रत्‍यारोपण

वॉन्टेड विरेंदर बसोयाला यूएईतून हिंदुस्थानात आणले

marathinews24.com

पुणे – आंतरराष्ट्रीय स्तरावरील तब्बल १३ हजार कोटी रुपयांच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणातील वॉन्टेड तर पुण्यातील 3 हजार 600 कोटींच्‍या ड्रग प्रकरणात सूत्रधार असलेल्‍या आरोपी विरेंदर सिंह बसोया ऊर्फ वीरू याला यूएईतून हिंदुस्थानात आणले आहे. प्रत्‍यारोपणाद्वारे त्‍याला अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये उघडकीस आणलेल्या १ हजार ८३७ किलो मेफेड्रोन तस्करी प्रकरणातील तो प्रमुख आरोपी आहे. रविवारी दुपारी (१६ ऑगस्ट) त्याला कडक सुरक्षा व्यवस्थेत पुणे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २१ ऑगस्टपर्यंत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) कोठडीत पाठविले.

डेक्कन जिमखाना भागातील हाॅटेलसमोर तरुणाचा खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी 

पुणे पोलिसांनी २०२४ मध्ये मेफेड्रोन तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले होते. पुणे आणि दिल्लीमधून तब्बल १ हजार ८३७ किलो मेफेड्रोन जप्त केले होते. त्यात पुण्यातून सुमारे ८६७ किलो, तर दिल्लीतून ९७० किलो मेफेड्रोन जप्त केले होते. पुणे आणि दिल्‍ली येथून पकडलेले 3 हजार 600 कोटींचे तर लंडनला पाठवलेले 400 कोटींचे ड्रग असे 4 हजार कोंटींच्या ड्रगप्रकरणी गुन्‍हा दाखल झाला होता. सुरुवातीला पुणे पोलिसांनी केलेला हा तपास नंतर एनसीबीच्या मुंबई विभागाकडे सोपविण्यात आला. आरोपी बसोयाकडून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्क, परदेशातील आर्थिक व्यवहार, तस्करीचे मार्ग आणि अन्य आरोपींच्या भूमिकेबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

लंडनमधून तस्‍करीचा कट रजण्यातील बसोया सुत्रधार
– बसोया हा संदीप धुनिया याच्या संपर्कात लंडनमधून मेफेड्रोन तस्करीचे जाळे चालवण्यात अग्रेसर
– दिल्लीतून ९७० किलो मेफेड्रोन पाठविण्याची योजना

– आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा परदेशातील प्रमुख सूत्रधार

– पुणे प्रकरणात नाव आल्यानंतर तो दुबईला पसार

– एनसीबीने बसोयाविरुद्ध इंटरपोलकडून रेड नोटीस

– जून २०२६ मध्ये त्याला यूएईमध्ये ताब्यात

– ‘ऑपरेशन ग्लोबल हंट’ अंतर्गत १४ ऑगस्टला भारतात आणले

– दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने एनसीबीला तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर

– पुणे प्रकरणात आतापर्यंत १६ आरोपींना अटक

मुख्य आरोपी धुनियाशी संबंध

बसोयाचा दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणलेल्या सुमारे १३ हजार कोटी रुपयांच्या कोकेन व अन्य अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणाशीही संबंध असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. संदीप धुनियाशी त्याचे निकटचे संबंध असल्याचेही तपासात समोर आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×