शिवाजीनगर पोलिसांची कारवाई; न्यायालयाकडून ५ दिवसांची पोलिस कोठडी
marathinews24.com
पुणे – Fake Job Scam : महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्रे, ओळखपत्रे, अन्य कागदपत्रांच्या आधारे भरतीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी जेजुरी येथील श्री मार्तंड देव संस्थानचा विश्वस्त राजेंद्र बबन खेडेकर याला शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी (दि.२९) अटक केली. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद बाळासाहेब पाटील आणि नमिता गोवर्धन बनसोडे यांच्याविरुद्धही यापूर्वी गुन्हा दाखल आहे. महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधीक्षकांनी फिर्याद दिली आहे.
हिवरा पहाडीच्या मुलीच्या रिपोर्टींगची उपमुख्यमंत्री सुनेत्राताईकडून दखल – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेतील विविध पदांवर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आरोपींनी बेरोजगारांकडून मोठ्या रकमा घेण्यात आल्या. त्यासाठी महापालिकेचे बनावट लेटरहेड, Fake Job Scam शिक्के आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करून नियुक्तीपत्रे तयार केली. उमेदवारांना ओळखपत्रे, सेवा पुस्तिका, वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि पगाराच्या पावत्याही दिल्याचे तपासात समोर आले आहे. काहींच्या खात्यात पगार जमा झाल्याचे भासविल्याचाही प्रकार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
आरोपींनी १४ पेक्षा अधिक जणांना बनावट नियुक्तीपत्रे देऊन सुमारे पावणेतीन कोटी रुपयांहून अधिक रक्कम उकळल्याचे प्राथमिक तपास उघडकीस आले आहे. सुरुवातीच्या तक्रारीत ४५ लाख रुपयांच्या फसवणुकीचा उल्लेख होता. आरोपी खेडेकरने यापूर्वी आरोप फेटाळून लावत आपणच या प्रकरणातील तक्रारदार असल्याचा दावा केला होता. Fake Job Scam आर्थिक व्यवहार अथवा बनावट कागदपत्रांशी आपला संबंध नसल्याचे त्याने म्हटले होते. त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज ऑगस्टमध्ये सत्र न्यायालयाने फेटाळला होता. दरम्यान, खेडेकरकडून बनावट कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि या प्रकरणातील अन्य सहभागींची माहिती घेण्यासाठी पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे.






















