Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

महिलांच्या प्रगतीसह शेतकऱ्यांचे प्रश्न माझ्या कार्याचा केंद्रबिंदू-डॉ. नीलम गोऱ्हे

महिलांच्या प्रगतीसह शेतकऱ्यांचे प्रश्न माझ्या कार्याचा केंद्रबिंदू-डॉ. नीलम गोऱ्हे

नवरात्र उत्सवानिमित्त देवीचे दर्शन; महिलांच्या प्रगतीसोबत शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यावरही भर

marathinews24.com

पुणे – नवरात्रीच्या पावन पर्वावर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी देवीचे दर्शन घेतले. यावेळी देवीस महावस्त्र, तुपाचा प्रसाद, पुरणपोळ्या तसेच श्रीफळ अर्पण करून समाजातील प्रगतीशील कामकाजाबद्दल देवीचे आभार मानले.

जीएसबी संयुक्त कोंकणी सभेतर्फे पुण्यात भव्य शारदोत्सव – सविस्तर बातमी 

या प्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “आज संपूर्ण भारतात व जगभर आदिमायेचा उत्सव सुरू असून महिलांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तंत्रज्ञानाचा वापर, क्रीडा क्षेत्रातील विक्रम, उच्च शिक्षणातील प्रगती तसेच पोलीस दलातील कार्यक्षमता यामुळे महिलांची कर्तृत्वकथा उज्ज्वल होत आहे. कालच स्मृती मानधनाने विराट कोहलीचा विश्वविक्रम मोडून महिलांची ताकद दाखवून दिली आहे.”

तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधत त्यांनी सांगितले की, “अवकाळी पावसामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे महसूल विभागाने तातडीने सुरू करावेत. शेतकरी आणि महिलांच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना अधिकाधिक शक्ती मिळो, अशी प्रार्थना देवीकडे केली.” आगामी काळात सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव व नाशिक जिल्ह्यांचा दौरा करून पंचायत राज संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

या दर्शनप्रसंगी त्यांच्या भगिनी जेहलम जोशी, शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी, नितीन पवार कोथरूड विभाग शहरप्रमुख, युवराज शिंगाडे शिवाजीनगर विधानसभा प्रमुख, राजू विटकर झोपडपट्टी पुनर्वसन प्रमुख, वैजयंती विजापुरे महिला आघाडी विभाग प्रमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×