Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

मुलीला नांदविण्यास न पाठविल्याने सासऱ्यावर शस्त्राने वार

किरकोळ वादातून रखवालदारावर चाकूने वार

जावयाविरुद्ध गुन्हा; माॅडेल काॅलनीतील घटना

marathinews24.com

पुणे – माहेरी निघून आलेल्या पत्नीला नांदविण्यास न पाठविल्याने सासऱ्यावर शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना माॅडेल काॅलनी भागात घडली. सासऱ्याचा खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी जावयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दत्तात्रय भिमाजी विटकर (वय ७०, रा. मारुती मंदिराजवळ, वडारवाडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी जावई मधुकर हडकमोल (वय ४५, रा. आमोदा, जि. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत विटकर यांचा मुलगा शशिकांत (वय ४०) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पुण्यात वाहन तोडफोडीच्या गुन्ह्यातील दोघांना बेड्या – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय विटकर यांच्या मुलीचा आरोपीशी विवाह झाला आहे. कौटुंबिक वादातून विटकर यांची विवाहित मुलगी चार महिन्यांपूर्वी माहेरी निघून आली होती. मुलीला नांदविण्यास पाठवावे, असे आरोपीने विटकर यांना सांगितले होते. विटकर हे माॅडेल काॅलनीतील एका सोसायटीत रखवालदार म्हणून काम करतात.
बुधवारी (१२ ऑगस्ट) आरोपी जावई विटकर यांच्या कामावर दुपारी साडेबाराच्या सुमारास गेला. माॅडेल काॅलनीतील सोसायटीच्या आवारात सासऱ्याशी वाद घालून त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. विटकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार तपास करत आहेत.

सोसायटीच्या आवारातील चंदनाचे झाड कापून नेले

पुणे-सोसायटीच्या आवारात शिरलेल्या चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना बिबवेवाडीतील संत एकनाथनगर सोसायटीत घडली. या प्रकरणी चंदन चोरट्यांविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांनी गु्न्हा दाखल केला.याबाबत अथर्व विजय ढमाले (वय २८, रा. संत एकनाथनगर, बिबवेवाडी) याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत एकनाथनगर परिसरातील सोसायटीच्या आवारात चोरटे बुधवारी (१२ ऑगस्ट) पहाटे शिरले. चोरट्यांनी आवारातील चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना सकाळी उघडकीस आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार पाटील तपास करत आहेत. सोसायटी, बंगले, शैक्षणिक संस्था, तसेच शासकीय कार्यालयांच्या आवारात शिरुन चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×