Breking News
Pune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत करा

कोैटुंबिक वादातून बालकाच्या तोंडात फेव्हिक्विक ओतले

Crime News

अतिदक्षता विभागात उपचार सुरू; भावजयीसह तिघांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – कौटुंबिक वादातून भावजयीने नऊ महिन्यांच्या बालकाच्या तोडात फेव्हिक्विक टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. फेव्हिक्विक ओतल्याने बालकाच्या तोंडात अंतर्गत जखमा झाल्या असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. याप्रकरणी लोहगाव पोलिसांनी भावजयीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

डिजिटल ॲरेस्ट’ची धमकी देऊन ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

अल्ताफ नबी शेख (वय ३९, रा. कलवड वस्ती, लोहगाव) यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसा, सानिया शेख (रा. कलवड वस्ती, लोहगाव), रियाज इमाम हल्याळ (वय ४८), हाजी मलंग शेख (दोघे रा. मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्ताफ शेख आणि त्यांचा भाऊ हे लोहगावमधील कलवड वस्तीत एकत्र राहतात. किरकोळ कारणावरुन कुटुंबात वाद झाले होते. ३१ जुलै रोजी दुपारी बाराच्या सुमारास भावजय सानिया हिने अल्ताफ यांच्या नऊ महिन्यांच्या मुलाच्या तोंडात फेव्हिक्विक ओतले. बालकांच्या तोंडात अंतर्गत जखमा झाल्या. अल्ताफ यांची पत्नी जैनब यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्या घाबरल्या. त्यावेळी अल्ताफ कामावर होते. घाबरलेल्या जैनब यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर नऊ महिन्यांच्या बालकाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बालकावर ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. जैनब यांनी आरोपी सानियाला जाब विचारला. तेव्हा हा प्रकार कोणाला सांगितला. तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. सानियाचे मुंबईतील नातेवाईक रियाज हल्याळ आणि हाजीमलंग शेख हे रुग्णालयात आले. बालकाची प्रकृती सुधारत आहे. सानियाविरुद्ध पोलीस तक्रार दिल्यास तुला दाखवितो, अशी धमकी दिली, असे जैनब शेख यांनी फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नऊ महिन्यांच्या बालकाच्या तोंडात फेव्हिक्विक ओतल्यानंतर त्याला तातडीने आई-वडिलांनी ससून रूग्णालयात दाखल केले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. बालकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. बालकाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, असे लोहगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×