Breking News
Pune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत करा

डिजिटल ॲरेस्ट’ची धमकी देऊन ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूक

कस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बँक खात्यातून दहशतवादी कारवायांसाठी पैसै पाठविण्यात आल्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाची १९ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ज्येष्ठ नागरिक डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लोणी काळभोरमध्ये मोटारीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे चिंचवड परिसरात राहायला आहेत. ते निवृत्त शासकीय कर्मचारी असून, त्यांचे बँक खाते डेक्कन जिमखाना भागातील एका बँकेत आहे. सायबर चाेरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर २९ जुलै रोजी संपर्क साधला आणि पोलीस असल्याची बतावणी केली. ’ तुमच्या बँक खात्याचा वापर दहशतवादी कारवायांसाठी झाला आहे. या प्रकरणात तुम्हाला डिजिटल ॲरेस्ट केली जाणार आहे.

अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे भरावे लागतील’, अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने शहानिशा न करता चोरट्यांच्या खात्यात १९ लाख ४५ हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सपना देवताळे तपास करत आहेत.

स्वस्तात सहलीच्या आमिषाने फसवणूक

स्वस्तात सहलीचे आमिष दाखवून एका पर्यटन कंपनीच्या संचालकांनी एक लाख तीन हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पर्यटन कंपनीच्या संचालक रेखा वैष्णव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जंगली महाराज रस्त्यावर निमा हाॅलिडेज या पर्यटन कंपनीचे कार्यालय आहे. पर्यटन कंपनीच्या संचालकाने तक्रारदाराला स्वस्तात सहलीचे आमिष दाखविले होते. तक्रारदाराकडून एक लाख तीन हजार रुपये जमा करुन घेण्यात आले. सहलीचे आयाेजन करण्यात आले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब अंतरकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×