Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

विमाननगर येथील हॉटेलमध्ये आग; अनुचित प्रकार नाही

अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आणली आटोक्यात

marathinews24.com

पुणे – शहरातील विमाननगर परिसरातील झी शान रेस्टाॅरंटमध्ये (हैदराबादी बिर्याणी हाऊस) बुधवारी दुपारी आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.

गुंतवणुकदारांची ८८ कोटींची फसवणूक – सविस्तर बातमी

विमाननगर-लोहगाव रस्त्यावर झी शान रेस्टाॅरंट आहे. हे उपहारगृह तीन मजली आहे. उपहारगृहाच्या छतावर बैठक व्यवस्था आहे. पहिल्या मजल्यावर भटारखाना आहे. बुधवारी दुपारी नेहमी भटारखान्यात तयारी सुरू होती. भट्टीला जोडलेल्या चिमणीत सुरुवातीला आग लागली. काही क्षणात आग पसरली. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यापर्यंत आग पाेहोचली. आग लागल्याने कामगार बाहेर पळाले. त्यावेळी उपाहारगृहात ग्राहक नव्हते. आग लागल्यानंतर गोंधळ उडाला.

अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करुन अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. उपाहारगृहात कोणी अडकले नसल्याची खात्री करण्यात आली. आगीत उपाहारगृहातील टेबल, खुर्च्या, भटारखान्यातील साहित्य जळाले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतर जवान तेथून परतले’, अशी माहिती अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख सोपान पवार यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×