Breking News
तडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत कराPune Fertilizer License Suspended : रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबित

गुंतवणुकदारांची ८८ कोटींची फसवणूक

व्यावसायिकाची १ कोटी १५ लाखांची फसवणूक

प्रकरणातील महिला आरोपीचे प्रत्यार्पण

marathinews24.com

पुणे – गुंतवणुकदारांची ८८ कोटी रुपयांची फसवणूक करुन परदेशात पसार झालेल्या महिला आरोपीचे प्रत्यार्पण करण्यात आले. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आरोपी उतरल्यानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (सीबीआय) तिला ताब्यात घेतले. महिला, तसेच तिच्या पतीविरुद्ध पुणे पोलिसांनी फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी दाम्पत्य हे परदेशात पसार झाले होते. तिच्या पतीचे नुकतेच प्रत्यार्पण करण्यात आले होते.

‘त्या’ व्हायरल व्हिडीओची राज्य मानवी हक्क आयोगाकडून दखल – सविस्तर बातमी

विशाखा अविनाश राठोड (रा. आनंदबन सोसायटी, रावेत) असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. गेल्या आठवड्यात तिचा पती अविनाश अर्जुन राठोड (रा. आनंदबन सोसायटी, रावेत) याचे संयुक्त अरब अमिरातीतून (यूएई) प्रत्यार्पण करण्यात आले होते. बाणेर परिसरात अविनाश राठोड आणि त्याची पत्नी विशाखा यांनी एपीएस वेल्थ व्हेंचर्स एलएलपी ही कंपनी सुरू केली होती. राठोड दाम्पत्याने गुंतवणुकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखविले होते. राठोड दाम्पत्याने सुरुवातीला गुंतवणूकादरांना परतावा दिला. त्यानंतर त्यांनी परतावा देण्याचे थांबविले. परतावा न मिळाल्याने गुंतवणूकदारांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात २० एप्रिल २०२३ रोजी तक्रार दिली. या तक्रारीवरुन राठोड दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल केल्यानंतर अविनाश आणि त्याची पत्नी विशाखा हे पसार झाले. राठोड दाम्पत्य पसार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आर्थिक गु्न्हे शाखेने न्यायालयात दोघांना फरार घोषित करण्याचे प्रक्रिया सुरू केली. न्यायालयाने त्याला फरार घोषित केले. राठोड दाम्पत्य परदेशात पसार होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी रेड काॅर्नर नोटीस बजाविली. विशेष न्यायालयात राठोड दाम्पत्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. राठोड दाम्पत्य परदेशात पसार झाल्याची माहिती तपासात मिळाली होती.

‘सीबीआयने परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून अविनाश आणि त्याची पत्नी विशाखा यांचे प्रत्यार्पण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गेल्या आठवड्यात तिचा पती अविनाश याचे प्रत्यार्पण करण्यात आले. मुंबई विमानतळावर त्याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याची पत्नी विशाखा हिचे प्रत्यार्पण करण्यात आले. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी (३ ऑगस्ट) तिला ताब्यात घेण्यात आले. तिला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले’, अशी माहिती ‘सीबीआय’मधील अधिकाऱ्यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×