Breking News
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्नजणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगहसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ – मकरंद टिल्लूतपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा -आमदार रोहित पवार

गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून फसवणूक

कंपनीत गुंतवणूकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी माॅडेल काॅलनीतील एकाची चार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांवरिुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गु्न्हा दाखल केला.याबाबत एकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वीजेच्या धक्क्याने कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांंनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शिवाजीनगरमधील माॅडेल काॅलनीत राहायला आहेत. माॅडेल काॅलनी परिसरात वाहिनीद्वारे गॅस पुरवठा होतो. गॅस देयक थकित असून, गॅस पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे, अशी भीती सायबर चोरट्यांनी त्यांना दाखविली. थकीत देयक ऑनलाइन पद्धतीने त्वरीत भरावे लागणार आहे, त्यासाठी बँक खात्याची माहिती द्यावी लागेल, असे चोरट्यांनी त्यांना सांगितले. चोरट्यांनी बँक खात्याची माहिती त्यांनी दिली. बँक खात्याला मोबाइल क्रमांक जोडण्यात आला आहे. चोरट्यांनी मोबाइल क्रमांक हॅक करुन बँक खात्यातील तीन लाख ९८ हजार रुपयांची रोकड ऑनलाइन पद्धतीने दुसऱ्या खात्यात जमा करुन घेतली. खात्यातून पैसे कमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अश्विनी ननावरे तपास करत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून गॅस, वीज देयक थकीत असून, त्वरीत पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे, अशी भीती दाखवून चोरट्यांकडून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×