Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

गुंतवणुकीच्या आमिषाने १ कोटी ९२ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष; २४ लाखांची फसवणूक

विमानतळ पोलिसांकडून एकाला अटक

marathinews24.com

पुणे – गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या गुंतवणुकीच्या  आमिषाने १ कोटी ९२ लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एकाला अटक केली. सचिन विलास कांबळे (वय ४२, रा. अमृत बंगला, थेरगाव, पिंपरी-चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. व्यावसायिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ५२ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कांबळे आणि तक्रारदार व्यावासायिकाची गेल्या वर्षी ओळख झाली होती. कांबळे याने लोहगाव परिसरात खासगी कार्यालय सुरु केले होते. तक्रारदार व्यावसायिक लोहगाव भागात राहायला आहे. आरोपीने व्यावसायिकाला गुंतवणुकीवर सात टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. व्यावसायिकाने सुरुवातीला ३३ लाख ८० हजार रुपये गुंतविले. तक्रारदार आणि परिचितांनी कांबळे याच्याकडे एकूण मिळून एक कोटी ९२ लाख ९५ हजार रुपये गुंतवणुकीस दिले. रक्कम गुंतविल्यानंतर त्यांना सुरुवातीला परताव्यापोटी काही रक्कम देण्यात आली. त्यानंतर कांबळेने त्यांना परताावा देणे बंद केले. परताव्याबाबत विचारणा केल्यानंतर कांबळेने टाळाटाळ सुरू केली.फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्यात गुंतवणुकदारांनी तक्रार अर्ज दिला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शरद शेळके तपास करत आहेत.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×