Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

मोबाईलवर ‘एपीके’ फाईल पाठवून ५० हजारांची फसवणूक

कस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मोबाईलवर ‘एपीके’ फाईल पाठवून त्याद्वारे मोबाईलचा ताबा मिळवत एका तरुणाची ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी गणेश हनुमंत काकडे (वय ३१, रा. कुडजे) याने फिर्याद दिली असून, अज्ञात मोबाईल धारक आणि बँक खातेधारकांविरुद्ध उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतिक्रमण विभाग अधिकाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ; गुन्हा दाखल – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपीने फिर्यादीच्या मोबाईलवर एक ‘एपीके’ फाईल पाठवली. फिर्यादीने ती फाईल उघडताच आरोपीने त्यांच्या मोबाईलचा ताबा मिळवला आणि खात्यातून ५० हजार रुपये परस्पर वळवून घेतले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस या ऑनलाईन चोराचा शोध घेत आहेत.

वाघोलीत मोलकरणीनेच लांबवले ५ लाखांचे दागिने

पुणे-विश्वासू समजल्या जाणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलेनेच मालकाच्या कपाटातील ५ लाख ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार वाघोलीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी लीना राजन मांढरे (वय ६३, रा. वाघोली) यांनी फिर्याद दिली असून, घरकाम करणारी महिला कल्पना हाथगले हिच्याविरुद्ध वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ५ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घडला. आरोपी कल्पना ही फिर्यादीच्या घरी घरकाम करत होती. तिने बेडरुममधील कपाटाचे लॉकर उघडून त्यातील सोन्याचे दागिने मालकाच्या संमतीशिवाय चोरून नेले. फिर्यादीने दागिने तपासले असता चोरीचा प्रकार उघड झाला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×