शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या आमिषाने फसवणूक

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ३७ लाखांची फसवणूक

पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्याने एकाला ५ लाख ६८ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २४ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२५ कालावधीत दत्तवाडीत घडली आहे. याप्रकरणी ४८ वर्षीय नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरात शिरून संसारपयोगी साहित्याची चोरी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे दत्तवाडीत राहायला असून, २४ ऑगस्टला सायबर चोरट्यांनी त्यांना व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड केले. त्याठिकाणी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीबाबतचे खोटे स्क्रीन शॉट व्हायरल केले. त्याद्वारे गुंतवणूकीवर चांगला परतावा मिळत असल्याचे तक्रारदारांना भासवले. त्यानंतर सायबर चोरट्याने संबंधिताला गुंतवणूक करण्यास सांगितले. अवघ्या दोन महिन्यात तक्रारदाराने तब्बल ५ लाख ६८ हजार रूपये गुंतवले. मात्र, त्यांना परतावा मिळाला नसल्यामुळे त्यांनी संपर्क केला. त्यावेळी त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड तपास करीत आहेत.

शेअर मार्केटचे मायाजाळ

कमीत कमी वेळेत जास्त नफा अथवा पैसे मिळवून देतो अशी बतावणी करीत सायबर चोरटे अनेकांना जाळ्यात अडकवत आहेत. विशेषतः व्हॉटसअ‍ॅप गु्रपसह फोनद्वारे जादा परताव्याचे आमिष दाखवले जात आहे. त्यामुळे सर्वसान्यांपासून ते उच्चशिक्षितांपर्यंत अनेकजण मायाजाळ्यात अडकत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, लाखो रूपये गुंतवणूक केल्यानंतर सायबर चोरटे संपर्क बंद करीत असल्यामुळे अनेकांवर मनस्तापाची वेळ येत आहे. त्यामुळे नागरिकांनो शेअर मार्केटच्या मायाजाळात तुम्ही अडकू नका, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×