Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

बीडमध्ये बालकांसाठी मोफत 2-डी इको व हृदय शस्त्रक्रिया तपासणी शिबिर

बीडमध्ये बालकांसाठी मोफत 2-डी इको व हृदय शस्त्रक्रिया तपासणी शिबिर

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, आरोग्यदूत फाउंडेशन, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि ज्युपिटर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवासेना नेते ज्ञानविजय बाजीराव चव्हाण यांच्या संयुक्त वाढदिवसानिमित्त बीड जिल्हा रुग्णालय येथे दि. १५ ऑगस्टला लहान मुलांसाठी मोफत 2-डी इको व हृदय शस्त्रक्रिया तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, आरोग्यदूत फाउंडेशन, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. बीड जिल्हा रुग्णालय येथे बालकांची मोफत 2-डी इको तपासणी तसेच हृदयविकारासंदर्भातील आवश्यक तपासणी करण्यात येणार आहे.

पुण्यात वाहतूक पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला पोलीस आयुक्तांकडून ब्रेक – सविस्तर बातमी 

तपासणीनंतर ज्या बालकांना हृदय शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, अशा बालकांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी आवश्यक मार्गदर्शन आणि वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये ज्युपिटर हॉस्पिटलचे निष्णात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. आशुतोष सिंह सर यांच्या मार्गदर्शनाखाली बालकांची तपासणी करण्यात येणार असून, शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया डॉ. आशुतोष सिंह सर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहेत.

त्यामुळे गरजू बालकांसाठी हे शिबिर अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार, यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख उपस्थितीमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे, पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान आणि जिल्हा शल्यचिकित्सक सतीश कुमार सोलंके यांची उपस्थिती राहणार आहे. या उपक्रमाचे आयोजन युवासेना मराठवाडा निरीक्षक व युवासेना लोकसभा संपर्क प्रमुख, बीड बाजीराव चव्हाण यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.

आर्थिक परिस्थितीमुळे अनेक गरजू कुटुंबांना आपल्या मुलांच्या हृदयावरील उपचार व शस्त्रक्रियांचा खर्च करणे शक्य होत नाही. अशा बालकांना वेळेवर निदान, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि आवश्यक हृदय शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.“एकही गरजू बालक उपचारापासून वंचित राहू नये” या सामाजिक भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा बीड जिल्ह्यातील गरजू पालकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×