Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

वाघोलीत भांडी विक्री दुकानात चोरी करणारे गजाआड

शिवीगाळ केल्याच्या वादातून वार, तिघांविरूद्ध गुन्हा

चोरट्यांकडून रोकड आणि चोरलेली रिक्षा असा मुद्देमाल जप्त

marathinews24.com

पुणे – वाघोलीत भांडी विक्री दुकानात चोरी करणारे गजाआड – नगर रस्त्यावरील वाघोली भागात एका भांड्याच्या दुकानात चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी चोरट्यांबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आहे. चोरट्यांनी शहरातून रिक्षा चोरल्याचे तपासात उघडकीस आले आहे. वाघोलीतील भांडी विक्री दुकानात चोरी करुन पसार झालेल्या चोरट्यांनी रिक्षाचा वापर केल्याचे तपासात उघडकीस आले. चोरट्यांकडून रोकड आणि चोरलेली रिक्षा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विजेच्या धक्क्याने बांधकाम मजुराचा मृत्यू – निष्काळजीपणामुळे बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा – सविस्तर बातमी 

अनिकेत अविनाश इंगळे (वय २१), साहिल रोशन शेख (वय २०, रा. दोघे, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वाघोली भागात स्टीलची भांडी विक्री करणारे दुकान आहे. ३१ जुलै रोजी मध्यरात्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी प्रवेश केला. गल्ल्यातील रोकड लांबवून चोरटे पसार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर दुकान मालकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. चोरटे रिक्षातून पसार झाल्याचे उघडकीस आले होते. सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोापींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली रिक्षा हडपसर भागातून चोरल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तांत्रिक तपास करून आरोपींना ताब्यात घेतले.

तपासात आरोपींनी हडपसर भागातून रिक्षा चोरली. त्यानंतर वाघोलीतील दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपी सराइत आहेत. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक आसाराम शेटे, उपनिरीक्षक मनोज बागल, सुवर्णा इंगळे, पोलीस कर्मचारी बाबासाहेब मोराळे, प्रवीण केदार, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे आणि पथकाने ही कामगिरी केली.

मोटारचालकावर तीक्ष्ण शस्त्राने वार – सेनापती बापट रस्त्यावरील घटना

पुणे – मोटारचालक तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना सेनापती बापट रस्त्यावरील वेताळबाबा चौकात घडली. तरुणावर वार करुन आरोपी मोटारीतून पसार झाले. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसंनी तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.

पृथ्वीराज कुमार नरवडे (वय १९, रा. भोसलेनगर, गणेशखिंड रस्ता) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी महेश प्रमोद पवार (वय २९), रोहित अशोक धोत्रे (वय २४), आकाश विलास कुसाळकर (वय ३४, रा. वडारवाडी) यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीराज आणि आरोपी हे ओळखीचे नाहीत. शनिवारी (२ ऑगस्ट) दुपारी पृथ्वीराज सेनापती बापट रस्त्याने मोटारीतून निघाला होता. त्या वेळी आरोपी पवार, धोत्रे, कुसाळकर हे पाठीमागून त्यांच्या मोटारीतून आले. पुढे जाण्यास जागा न दिल्याने आरोपींनी पृथ्वीराजला शिवीगाळ करुन त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर आरोपींनी मोटारीतून त्याचा पाठलाग केला,
सेनापती बापट रस्त्यावरील गजबजलेल्या वेताळबाबा चौकात आरोपींनी मोटारचालक पृथ्वीराज याची मोटार दुपारी दीडच्या सुमारास अडवली. आरोपींनी त्यांची मोटार आडवी लावली.

आरोपींनी पृथ्वीराज याला त्याच्या मोटारीतून बाहेर ओढले. त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. एका आरोपीने पृथ्वीराजच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. ‘तुला आता जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देऊन आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. असे म्हणत बेदम मारहाण केली. भर चौकात मोटारचालक तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याने घबराट उडाली. या घटनेची माहिती माहिती मिळताच चतु:शृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पसार झालेले आरोपी पवार, धोत्रे, कुसाळकर यांना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक शोभा भांडवलकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×