Breking News
शोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडापुण्यात खासगी विद्यार्थी वसतिगृहातून लॅपटाॅप चोरीलामाॅडेल काॅलनीत घरफोडी; ९ लाखांचे दागिने चोरीला

तब्बल ११९ गुन्हे असलेल्या कुख्यातासह टोळीला बेड्या

युनीट सहाने जप्त केला मोठा शस्त्रसाठा

marathinews24.com

पुणे – राज्यातील विविध भागातील पोलीस ठाण्यात तब्बल ११९ गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुंडासह साथीदारांना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनीट सहाला यश आले आहे. टोळीकडून पिस्तूल, ४ काडतुसे,धारदार शस्त्र, मोटार असा मिळून ६ लाख ११ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. संबंधित टोळीला दरोडा टाकण्यापुर्वीच रोखल्यामुळे गंभीर गुन्हा घडला नाही. अजयसिंग अर्जुनसिंग दुधाणी (रा. मांजरी बुद्रूक) रामजितसिंग रणजितसिंग टाक (रा. गाडीतळ, हडपसर) अभयसिंग सिंकदरसिंग जुन्नी (रा. गंगानगर, फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

बिबवेवाडीत डिलेव्हरी बॉयला लुटले, दोघांना अटक – सविस्तर बातमी

कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने युनीट सहाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, उपनिरीक्षक राहूल कोळपे हे पथकासह हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी मांजरी ठाण्याच्या हद्दीतील भापकर मळा रोड रेल्वे पुलाजवळ एक मोटार संशयास्पद उभी असल्याचे दिसून आले. त्यामुळे पथक त्यांच्याजवळ गेले असता, गाडीतील काहीजणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकाने त्यांचा पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत पिस्तूल, चार जिवंत काडतुसे, सहा शस्त्रे, दरोड्यासाठी लागणारे साहित्य असा ऐवज मिळून आला. संबंधित आरोपी हे दरोडा टाकणार असल्याची कबुली त्यांनी दिली.

आरोपी अजयिंसग दुधाणी हा कुख्यात गुंड असून राज्यातील विविध पोलीस ठाण्यात त्याच्याविरूद्ध तब्बल ११९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर दुसरा आरोपी रामजितसिंग टाक आणि अभयसिंग जुन्नी यांच्याविरूद्ध प्रत्येकी ६ पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त गौहर हसन, एसीपी राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, प्रमोद टिळेकर, तानाजी देशमुख, प्रशांत कर्णवर, बाळासाहेब सकटे, श्रीकांत पांडुळे, अमित कांबळे, अनिल जामगे, गणेश माने, उमेश शेलार, शेखर काटे यांनी केली.

दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत टोळीला अटक करून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. मुख्य आरोपी अजयसिंग दुधाणी हा कुख्यात असून त्याच्याविरूद्ध तब्बल ११९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. इतर आरोपीविरूद्धही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पथकाने शिताफीने टोळीला अटक केल्यामुळे दरोड्याचा प्रकार घडला नाही.

सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक, युनीट सहा

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×