Breking News
बलात्काराच्या गुन्ह्यात पसार आरोपी लातूरमधून अटकेतकोंढव्यात गांजा विकणाऱ्या महिलेसह दोघे अटकेतमौजमजेसाठी मोबाइल चोरणारे गजाआडसुट्टीला गावी चाललाय, पण घरांच्या सुरक्षिततेचे काय ?नसरापूर प्रकरणी बाल हक्क संरक्षण आयोगाची गंभीर दखलउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली नसरापूर घटनेतील पीडित कुटुंबीयांची भेटनसरापुरात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी – डॉ. नीलम गोऱ्हेपुण्यात तब्बल २८ लाखांची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यातसत्ताधाऱ्यांविरोधात एकजुटीने व सातत्यपूर्ण संघर्ष करण्याची गरज‘जनगणना २०२७’ कल्याणकारी योजनांची सुनिश्चिती- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

मौजमजेसाठी मोबाइल चोरणारे गजाआड

येरवडा पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – मौजमजा करण्यासाठी नागरिकांकडील मोबाइल चोरणाऱ्या दोघांना येरवडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ४३ मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी राजकुमार सोनू पाटील (वय १९, रा. ताडीवाला रस्ता) गैारव बाळू खुडे (वय १९, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांना अटक करण्यात आली. येरवडा परिसरात एका पादचाऱ्याचा मोबाइल हिसकावून नेण्याची घटना २९ एप्रिलला रात्री घडली होती. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. येरवडा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता.

सुट्टीला गावी चाललाय, पण घरांच्या सुरक्षिततेचे काय ? – सविस्तर बातमी

पादचाऱ्याचा मोबाइल हिसकावणारे चोरटे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी साईनाथ म्हस्के यांना मिळाली. त्यानंतर तपास पथकाने सापळा लावून पाटील आणि खुडे यांना पकडले. चैाकशीत दोघांनी पुणे रेल्वे स्थानक, तसेच निर्जन रस्त्यांवर पादचाऱ्यांकडील मोबाइल संच हिसकावून नेण्याचे गुन्हे केल्याची कबुली दिली. तपासात त्यांच्याकडून दोन लाख ६५ हजार रुपयांचे ४३ मोबाइल संच जप्त करण्यात आले. मौजमजेसाठी आरोपींनी माेबाइल हिसकाविण्याचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, सहायक आयुक्त सुनील जैजापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय ठाकर, सहायक निरीक्षक प्रसन्न जराड, उपनिरीक्षक किशोर बेरड, शैलेश बावळे, मुकुंद कोकणे, संदीप जायभाय, साईनाथ म्हस्के, नटराज सुतार, बालाजी सोगे यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×