शेअर बाजाराचे आमिष दाखवून फसवणूक
marathinews24.com
पुणे – सायबर चोरट्यांनी नागरिकांना वेठीस धरून ऑनलाईनरित्या लुटीचे सत्र कायम असून, विविध स्वरूपाचे आमिष दाखवून फसवणूक केली जात आहे. अशीच एक घटना लोहगावमध्ये घडली असून, सायबर चोरट्यांनी तरूणाला शेअर मार्वेâटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्याबदल्यात काही रकमेचा परतावा त्यांना दिला. त्यामुळे विश्वास संपादित झाल्यानंतर तक्रारदाराने तब्बल २६ लाख रूपये ऑनलाईनरित्या गुंतविले. मात्र, सायबर चोरट्यांनी त्यांना परतावा न देता फसवणूक केली आहे.
पीएमपीएल बसप्रवासात सोन्याच्या पाटल्या चोरीला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे लोहगावमधील साठे वस्ती परिसरात राहायला आहेत.२८ मार्चला सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क केला. त्यांना एक लिंक पाठवून मोबाइल अॅप्लीकेशनद्वारे शेअर्स विकत घेण्यास सांगितले. त्याबदल्यात सुरूवातीला सायबर चोरट्यांनी त्यांना काही प्रमाणात नफा ऑनलाईनरित्या वर्ग केला. त्यामुळे त्यांचा विश्वास बसल्यामुळे तक्रारदाराने गुंतवणूक करण्यास सुरूवात केली. अवघात १८ दिवसांत तब्बल २६ लाखांची गुंतवणूक केल्यानंतरही सायबर चोरट्यांनी त्यांना आणखी गुंतवणूक करण्यास सांगितले. मात्र, संशय आल्यामुळे त्यांनी गुंतवणूकीचा परतावा देण्याची मागणी केली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने विमानतळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक आशालता खापरे तपास करीत आहेत.