Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

पुणे जिल्ह्यात गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दापाश, आरोपीला अटक

मशीन जप्त, इतरांचा शोध सुरू

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील गावोगावी जाऊन सोनोग्राफीद्वारे महिलांचे गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दापाश केला आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून, डॉक्टसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केले आहे. त्यांच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना केले आहे. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्यातील विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख उपस्थित होते.

पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी

आण्णासाहेब गिरी (रा. केंडगाव, ता. दौंड, मूळ रा. पारनेर, जि. नगर) याला २० मे रोजी अटक केली आहे. तर डॉक्टर अतुल अंकुश जाधव (रा. लोहगाव), नरेंद्र साहेबराव ठाकरे (रा. केसनंद, ता. हवेली), मंदार सुरेश माळी (रा. किकवी, ता. भोर) आणि सुंदरम कदम (रा. उरुळीकांचन, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी केडगाव परिसरात गर्भलिंग निदान प्रकरणात कारवाई करत मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. फिर्यादी डॉ. सचिन विठ्ठल गुजर यांना १७ मे रोजी एकाने महिलेचे गर्भलिंग निदान करत असल्याचा व्हिडिओ पाठवला होता. या व्हिडिओच्या आधारे १९ मे यवत पोलीस ठाण्यात त्यांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान आरोपी आण्णासाहेब गिरी याने नरेंद्र ठाकरे याच्याकडून सोनोग्राफी मशीन घेतल्याचे निष्पन्न झाले.

मुख्य आरोपी गिरी याला अटक केल्यानंतर गुन्ह्यात अतुल जाधव (रा. लोहगाव), नरेंद्र ठाकरे (रा. केसनंद, ता. हवेली), मंदार माळी (रा. किकवी, ता. भोर) सुंदरम कदम (रा. उरुळीकांचन) यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. तसेच जप्त केलेल्या व्हिडिओंची पडताळणी केल्यानंतर आरोपी आण्णासाहेब गिरी स्वतः गर्भलिंग निदान करत असल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १५ साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत. आरोपींच्या बँक खात्यांचे व्यवहार, मोबाईल सीडीआर आणि इतर तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण सुरू आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण देशमुख यांनी केली.

आरोपी गिरी १२ पास अन करत होता, गर्भलिंग तपासणी

आरोपी अण्णासाहेब गिरी हा बारावी पास असून त्याने बी फार्मसीसाठी प्रवेश घेतला होता, मात्र ते शिक्षण त्याने पूर्ण केले नाही. त्यानंतर एका आयुर्वेदिक डॉक्टरसाठी एम आर म्हणून त्यांनी काम पाहिले. या सगळ्या अनुभवाच्या जोरावर आरोपीने महिलांची अवैधरित्या गर्भलिंग निदानाची तपासणी सुरू केली. गिरीने आणखी दोन जिल्ह्यात अशाच प्रकारे बेकायदेशीर रित्या गर्भलिंग निदान तपासणी केली आहे त्या अनुषंगाने तपास केला जात आहे.

तपासणीसाठी ५० हजारांपर्यंत घेत होता रक्कम

आरोपी गिरी हा गावोगावी जाऊन महिलांची गर्भलिंग निदानची तपासणी करत होता. त्यासाठी प्रत्येकी साधारणपणे ४० ते ६० हजार तो फीस घेत होता. त्यासोबतच घरची परिस्थिती उत्तम असल्यास त्याची रक्कम देखील तो वाढ होत होता असे तपासात निष्पन्न झाले आहे.

शेकडो महिलांची झाली गर्भलिंग निदान चाचणी

कायद्याने प्रतिबंध असलेल्या गर्भलिंगनिदान चाचणी करत आरोपींनी पैशांसाठी हे सगळे षड्यंत्र असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मागील पाच वर्षात शेकडो महिलांची आरोपीने तपासणी केली असून, याप्रकरणी संबंधित सर्वांकडे तपासणी केली जाणार असून त्यांच्यावर देखील अटकेची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे.

जिल्ह्यातील केडगाव परिसरात गर्भलिंग निदान करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असून, तांत्रिक तपासात आरोपी हा १२ ते १५ डॉक्टरांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार तपासाला गती दिली असून, याची पाळेमुळे खोदून काढली जाणार आहेत.

संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×