Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

‘मोक्का’ कारवाईनंतर पसार सराईत छत्रपती संभाजीनगरमधून अटकेत

‘मोक्का’ कारवाईनंतर पसार सराईत छत्रपती संभाजीनगरमधून अटकेत

चार महिने तो पोलिसांना गुंगारा देत होता आरोपी

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर गेले चार महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराइताला गुन्हे शाखेने छत्रपती संभाजीनगर परिसरातून अटक केली. अजय उर्फ भज्या प्रकाश निकाळजे (वय ३२, सध्या रा. काकडे वस्ती, कोंढवा, मूळ रा. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. निकाळजे याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दहशत माजविणे, लूटमार, वाहन चोरी असे गंभीर स्वरुपाचे १२ गु्न्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्याविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये् (एमपीडीए) कारवाई करुन वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते.

कौटुंबिक छळ अन जादूटोण्यामुळे व्यावसायिकाची आत्महत्या – सविस्तर बातमी 

कोंढवा परिसरात एकावर त्याने पिस्तुलातून गोळीबार केला होता. या प्रकरणी निकाळजेसह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. मकोका कारवाई केल्यानंतर तो पसार झाला होता. गेले चार महिने तो पोलिसांना गुंगारा देत होता. तो छत्रपती संभाजीनगर परिसरात असल्याची माहिती पोलीस कर्मचारी शशिकांत नाळे आणि राहुल ढमढेरे यांना मिळाली.

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर परिसरात सापळा लावून अटक केली. गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पोलीस निरीक्षक संदीपान पवार, उपनिरीक्षक अभिजित पवार, विनाेद शिवले, शहाजी काळे, प्रताप गायकवाड, उमाकांत स्वामी, अमर चव्हाण, अकबर शेख, अविनाश इंगळे, सुधीर साेनवणे, नैत्रिका अडसूळ, मयुरी पालवे यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×