Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

व्हीआयपी नंबरच्या दुचाकी चोरायचा अन पोलीस लोगो लावायचा

व्हीआयपी नंबरच्या दुचाकी चोरायचा अन पोलीस लोगो लावायचा

बारामतीमध्ये सराईताला बेड्या, १३ बुलेटसह १९ दुचाकी जप्त

marathinews24.com

पुणे – व्हीआयपी क्रमांक असलेल्या बुलेट हेरून रात्रीच्या वेळी चोरी केल्यानंतर गाड्यांवर महाराष्ट्र पोलीस, वनविभाग, एसटी महामंडळाचा लोगो वापरून बिनधास्तपणे वावरणार्‍या सराईताला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेसह बारामती तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून तब्बल १३ बुलेटसह १९ दुचाकी असा मिळून ३० लाखांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. समाधान बाळू काळे (वय २३ रा. मानेवाडी ता. फलटण जि.सातारा) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे.

पुण्यात पिस्तुलांचा शस्त्रसाठा जप्त, युनीट दोनची कामगिरी – सविस्तर बातमी 

बारामती शहरासह तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ दिवसांपासून वाहन चोरीच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली होती. चोरीच्या घटनेत बहुतांश महागड्या बुलेटचा समावेश होता. त्यापार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी चैतन्य कदम यांनी चोरट्याचा माग काढण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी स्थानिक पोलिसांसह एलसीबी पथकाकडून समांतर तपास केला जात होता. तपास पथक बारामती शहर परिसरात गस्त घालत असताना संशयित चोरटा दुचाकी घेउन मेडीकल कॉलेज परिसरात येणार असल्याची माहिती एलसीबी पथकाला मिळाली. पथकाने पाठलाग करून आरोपी समाधान काळे याला ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपी काळे याने १३ बुलेट, ६ इतर दुचाकी अशा १९ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तो रात्रीच्या सुमारास एकटाच दुचाकींची चोरी करीत होता. व्हीआयपी क्रमांकाच्या बुलेटसह इतर दुचाकी चोरी केल्यानंतर त्यावर महाराष्ट्र पोलीस, वनसेवा, एसटी महामंडळ असे लोगो लावत होता. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक नारायण पवार, उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, उपनिरीक्षक बाळासाहेब कारंडे, शिवाजी निकम, किशोर तेलंग, स्वप्निल अहिवळे, शैलेश स्वामी, गुलाब पाटील, सुलतान डांगे, तुषार चव्हाण, रईस मुलानी, गणेश डेरे अभिजीत एकशिंगे, शशिकांत दळवी, भगवान थोरवे, मनोज पवार, सुरेंद्र वाघ, जितू शिंदे, भारत खारतोडे, जयश्री आटोळे, विठ्ठल तरंगे यांनी केली आहे.

पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल

व्हीआयपी क्रमांकाच्या दुचाकी चोरल्यानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपी काळे हा लोगो बनवून घेत होता. महाराष्ट्र पोलीस लोगोसह इतर लोगो दुचाकींवर लावून तो फिरत होता. पोलिसांपासून वाचण्याचा प्रयत्न करत असल्याची कबुली त्याने दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×