Breking News
रासे गृहसंकुल प्रकल्पामुळे आदिवासी कुटुंबाना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा मार्ग सुकर – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारएचआयव्हीग्रस्त मुलांच्या निवाऱ्याच्या नावावर खंडणीश्रीक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी शासन सकारात्मक; संस्थानच्या मागण्यांवर योग्य निर्णय घेणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारमराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्यपुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीरप्रोफेशनल रियल्टर्स असोसिएशन ऑफ पुणेतर्फे (प्रॉप) ‘प्रॉप कनेक्ट २०२६’ राष्ट्रीय परिषदेचे ६ जुलैला आयोजनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारथी कार्यालयास भेटलष्करी गणवेश शिवण्याच्या बतावणीने टेलरिंग व्यावसायिकाची फसवणूकपुण्यात गणेश पेठेत भरदिवसा घरफोडीनिलेश घायवळ टोळीतील गुंड अटकेत

नऱ्हे भागात घरफोडी; ७ लाखांचा ऐवज चोरीला

व्यावसायिकाच्या फ्लॅटमधून ५ लाखांचे दागिने चोरीला

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सहा लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज लांंबविल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत संपत अशोकराव पाठक (वय ४१, रा. नऱ्हे) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे सासरे हे नऱ्हे भागातील साईशांती सोसायटीत राहायला आहेत. ४ जून रोजी ते दुपारी तीनच्या सुमारास सदनिका बंद करुन बाहेर पडले. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने, रोकड असा सहा लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. घरफाेडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चित्रीकरणात तीन चोरटे दिसून आले आहेत. पोलीस उपनिरीक्षक घाडगे तपास करत आहेत.

सोसायटीच्या प्रशासकाने केली ३२ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

हडपसर येथील फुरसुंगी भागातील एका सदनिकेतून चोरट्यांनी लॅपटाॅप आणि मोबाइल असा ९६ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संदेश एम. एस. (वय २६, सध्या रा. झोलो विसडम सोसायटी, फुुरसुंगी) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संदेश हे मूळचे कर्नाटकातील म्हैसुरचे आहेत. चोरट्यांनी सदनिकेतून लॅपटाॅप आणि मोबाइल चाेरुन नेल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस उपनिरीक्षक खंदारे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×