पत्नीच्या त्रासामुळे नवऱ्याची आत्महत्या

पत्नीच्या त्रासामुळे नवऱ्याची आत्महत्या

येरवडा भागात घटना

marathinews24.com

पुणे – पत्नीच्या त्रासामुळे नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येरवडा भागात घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पत्नीसह तिच्या आईविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षय विजय साळवे (वय २६, रा. गणेशनगर, येरवडा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी दीपाली अक्षय साळवे (वय २४), तिची आई संगीता अशोक अडागळे (रा. भगवाननगर, गेवराई, जि. बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अक्षय याची आई लक्ष्मी विजय साळवे (वय ५२) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दुचाकीच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयचा दीपालीशी सहा महिन्यांपूर्व विवाह झाला होता. विवाहानंतर दीपाली आणि तिची आई संगीता यांनी अक्षयला आई-वडिलांपासून वेगळे राहण्यास सांगितले. वेगळे राहण्यासाठी त्याच्यावर दबाब आणला. त्याच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या. पत्नी आणि सासूच्या त्रासामुळे अक्षयने १९ सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी आणि सासूच्या त्रासामुळे मुलगा अक्षयने आत्महत्या केल्याचे त्याची आई लक्ष्मी साळवे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक दळवी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×