मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरातील घटना
marathinews24.com
पुणे – भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या दुचाकीस्वाराविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पार्वती लिंगाप्पा कोळी (वय ५५, रा. वक्रतुंड हाईट्स, मानाजीनगर, नऱ्हे) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोळी यांचा मुलगा लक्ष्मण (वय ३६) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तडीपारीचे उल्लंघन करून फिरणाऱ्या ५ जणांना दणका – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्वती कोळी या रविवारी (२१ सप्टेंबर) सकाळी साडेनऊच्या सुमारास मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन निघाल्या होत्या. त्यावेळी सेवा रस्त्यावर भरधाव दुचाकीने पादचारी कोळी यांना धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता दुचाकीस्वार पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या पार्वती यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पसार झालेल्या दुचाकीस्वाराचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक तुपसौंदर तपास करत आहेत.



















