Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

पोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाण

पोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाण

खाकी वेशात धमकी देत आरोपीचा धिंगाणा; लोहगाव पोलिसांकडून शोध सुरू

marathinews24.com

पुणे – पोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाण केल्याची घटना लोहगाव भागात घडली.याप्रकरणी लोहगाव पोलीस ठाण्यात संबंधिताने तक्रार दिली आहे. त्यानुसार दुचाकीस्वाराविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार १७ वर्षीय तरूण शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीवरुन मित्रासोबत घरी निघाला होता. लोहगावमधील डी. वाय. पाटील महाविद्यालयाजवळ असलेल्या चौकात पाणी साचले होते.

जनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करा – सविस्तर बातमी 

साचलेल्या पाण्यातून दुचाकी गेल्यान दुचाकीस्वाराच्या अंगावर पाणी उडाले. त्याने दुचाकीस्वाराची माफी मागितल्यानंतरही आरोपी दुचाकीस्वाराने मारहाण केली. पोलीस असल्याची बतावणी करीत ठाण्यात चल, तुला दाखवितो, अशी धमकी दिली. त्यानंतर दुचाकीस्वार तेथून पसार झाला. आरोपी दुचाकीस्वाराने हेम्लेट, जाकीट, खाकी पॅण्ट परिधान केली होती. दुचाकीवर महाराष्ट्र पोलीसचे बोधचिन्ह असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी लोहगाव परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×