Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

शेतकरी बांधवानो, आपले सरकार सेवा केंद्रावरील आधार प्रमाणीकरण करुन घ्या-जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप

marathinews24.com

पुणे – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आपले नाव आलेल्या शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जावून आपले आधार प्रमाणीकरण करुन घेण्याचे आवाहन पुणे ग्रामीण सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी केले आहे.

‘नारी शक्ती महोत्सव २०२६’मधून महिला सक्षमीकरण, संस्कृती आणि कलेचा त्रिवेणी संगम – सविस्तर बातमी

आधार प्रमाणीकरणाकरणाची सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून शेतकऱ्यांनी केंद्र चालकास आधार क्रमांक किंवा कर्जमुक्ती यादीतील त्याच्या नावासमोरचा विशिष्ट क्रमांक सादर करावा. केंद्र चालकाने शेतकऱ्यांच्या विशिष्ट क्रमांक किंवा आधार क्रमांकाद्वारे शेतकऱ्यांची अँग्रीस्टॅक (Agristack) नोंदणी पोर्टलवरून तपासावी शेतकऱ्यांची अँग्रीस्टॅक नोंदणी झाली नसल्यास केंद्र चालकाने शेतकऱ्यांची अँग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करावी. केंद्र चालकाने शेतकऱ्यांची अँग्रीस्टॅक नोंदणी झाल्याची खात्री झाल्यानंतर शेतकऱ्यांचा कर्ज खात्याचा तपशील प्राप्त करावा.

केंद्र चालकाने संगणक पटलावर दिसत असलेल्या आधार क्रमांक, कर्ज खाते क्रमांक व कर्ज खात्यातील थकीत रकमेबाबत शेतकऱ्यांकडून खात्री करून घ्यावी. शेतकऱ्यांनी सर्व माहितीस सहमती दर्शवल्यासः बायोमेट्रिक पद्धतीने प्रमाणीकरण करावे. Agree व Submit ही प्रक्रिया पूर्ण करावी व प्रणालीवरून प्राप्त झालेली पावती शेतकऱ्याला द्यावी.

शेतकऱ्याची आधार क्रमांकाबाबत असहमती असल्यास: केंद्र चालकाने प्रथमतः शेतकऱ्याचे मूळ आधारकार्ड तपासावे. त्यानंतर योग्य आधार क्रमांक नोंदवून शेतकऱ्याचे बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण करावे. आधार क्रमांक चुकीचा असल्याची नोंद घ्यावी. याबाबतची तक्रार जिल्हास्तरीय समितीकडे पाठविल्याची माहिती द्यावी व प्रणालीवरून प्राप्त झालेली तक्रार पावती शेतकऱ्यास द्यावी.

शेतकऱ्याची कर्ज रक्कम किंवा कर्ज क्रमांकाबाबत असहमती असल्यास : केंद्र चालकाने प्रथमतः शेतकऱ्याचे बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण करावे. त्यानंतर कर्जखात्याच्या तपशीलबाबत असहमतीची नोंद करावी. याबाबतची तक्रार जिल्हास्तरीय समितीकडे पाठविल्याची माहिती द्यावी व प्रणालीवरून प्राप्त झालेली तक्रार पावती शेतकऱ्यास द्यावी.

शेतकऱ्यांच्या बोटांचा ठसा वापरून प्रमाणीकरण नोंदविता येत नसल्यास इतर बोटांचे ठसे वापरून दोन ते तीन वेळा प्रयत्न करावा. त्याद्वारेसुद्धा प्रमाणीकरण होत नसल्यास Unable To Authenticate हा पर्याय वापरून केंद्र चालकाने स्वतःच्या बोटांद्वारे आधार प्रमाणीकरण करावे. याबाबतची तक्रार तहसीलदार यांच्याकडे दाखल करता येईल. प्रणालीवरून प्राप्त झालेली तक्रार पावती शेतकऱ्यास द्यावी, अशी माहिती जगताप यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×