Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

‘नारी शक्ती महोत्सव २०२६’मधून महिला सक्षमीकरण, संस्कृती आणि कलेचा त्रिवेणी संगम

‘नारी शक्ती महोत्सव २०२६

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २७ ते २९ जुलै दरम्यान चिंचवड, पुणे येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

marathinews24.com

मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने, समरसता साहित्य परिषद यांच्या सहकार्याने तसेच आमदार उमाताई खापरे यांच्या पुढाकारातून ‘नारी शक्ती महोत्सव २०२६’ अंतर्गत २७ वा स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सोमवार, दि. २७, २८ व २९ जुलै २०२६ या कालावधीत सकाळी १०.३० वाजल्यापासून रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड, पुणे येथे विविध सांस्कृतिक, संगीत, नृत्य आणि भक्तिपर कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे.

“पाच फुटाचा बच्चन” मधून दुमदुमणार राम कृष्ण हरीचा गजर; एकपात्री नाटक ते सिनेमा : पाच फुटाच्या बच्चनचा दैदीप्यमान प्रवास – सविस्तर बातमी 

या महोत्सवाचे उद्घाटन मा. मंत्री सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास, महाराष्ट्र राज्य ॲड. आशिष शेलार यांच्या शुभहस्ते होणार असून, विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सांस्कृतिक सोहळा संपन्न होणार आहे. “नारी शक्ती – समाज शक्ती – राष्ट्र शक्ती” या संकल्पनेवर आधारित या महोत्सवातून महिलांच्या कर्तृत्वाचा, सर्जनशीलतेचा आणि सांस्कृतिक योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, सोमवार दि. २७ जुलै रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत भव्य भजनी सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ७.०० वाजता नूपुर नृत्यालय यांच्या वतीने डॉ. सौ. सुमेधा गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नृत्य गाथा (भक्ती, शक्ती, संस्कृती)’ हा विशेष नृत्याविष्कार सादर केला जाणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता सुप्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र आणि सहकलाकार ‘भाव सप्तक’ यांच्या ‘सावन सरी’ या पावसावर आधारित मराठी व हिंदी गीतांच्या कार्यक्रमाने रसिकांना सुरेल संगीताची पर्वणी अनुभवता येणार आहे.

मंगळवार, दि. २८ जुलै रोजी पारंपरिक भव्य मंगलागौरी सादरीकरण होणार आहे. सायंकाळी ७.०० वाजता सुवर्णा बाग यांच्या शिष्यांचा नृत्यांजली कार्यक्रम सादर केला जाईल. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता सुप्रसिद्ध गायिका विदुषी सानिया पाटणकर यांचा अभंग व शास्त्रीय संगीतावर आधारित गायनाचा कार्यक्रम रंगणार आहे.

बुधवार, दि. २९ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजता लोकप्रिय गायिका व अभिनेत्री केतकी माटेगावकर यांचा विशेष गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या सुरेल मैफलीने महोत्सवाची सांगता होणार आहे.

महिलांच्या कलागुणांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, भारतीय संस्कृतीतील समृद्ध परंपरांचे जतन व संवर्धन करणे तसेच संगीत, नृत्य आणि भक्तीपर कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य, संस्कारमूल्ये आणि सांस्कृतिक जाणीव अधिक दृढ करणे, या उद्देशाने मा. मंत्री सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास, महाराष्ट्र राज्य ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

या तीन दिवसीय महोत्सवातील सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य असून, पुणे, पिंपरी-चिंचवड व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×