Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पुण्यात नशेसाठी इंजेक्शनचा वापर, ५ जण अटकेत

१० कोटींच्या सायबर फसवणूक प्रकरणात रिलस्टारला बेड्या

तब्बल ५० बाटल्या जप्त

marathinews24.com

पुणे – नशेसाठी इंजेक्शनचा वापर करण्यात येत असल्याचा प्रकार आंबेगाव पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी पाच जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून मेफिवान ओैषधी इंजेक्शनच्या ५० बाटल्या जप्त केल्या आहेत. अथर्व इंद्रजीत शिंदे (वय २४) अथर्व इंद्रजीत शिंदे (वय २४, दोघे रा. उर्मिला सोसायटी, गुलाबनगर, धनकवडी) अविनाश शिवा बळुंगी (वय २२, रा. छत्रपती संभाजीनगर, धनकवडी) प्रदीप जितेंद्र हुंबरे (वय २६,रा. सिद्धीविनायक सोसायटी, आंंबेगाव) पियूष गणेश भरम (वय २६, रा. कचरावत चाळ, आंबेगाव) लक्ष्मण परमेश्वर माने (वय १९, रा. माने निवास, साईसिद्धी चौक, आंबेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस कर्मचारी नितीन कातुर्डे यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लग्नाच्या आमिषाने अभियंत्याची ९८ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

कात्रज-दत्तनगर रस्त्यावर २४ जुलैला रात्री साडेअकराच्या सुमारास इंजेक्शनची विक्री करण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. इंजेक्शनचा वापर नशेसाठी करण्यात येत असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्यांना पकडले. आरोपींकडे असलेल्या पिशवीची तपासणी केली. तेव्हा त्यात इंजेक्शनच्या बाटल्या सापडल्या. मेफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या (मेफीवन) ५० बाटल्या सापडल्या. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय काही जण इंजेक्शनचा वापर शरीर सौष्ठवासाठी करत असून, या इंजेक्शनचा वापर काही जण नशेसाठी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित इंजेक्शनची बेकायदा जादा दराने विक्री करण्यात येत असल्याचे उघडकीस आले. न्यायालयाने आरोपींनी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही कामगिरी आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, सहायक निरीक्षक स्वाती देवधर, उपनिरीक्षक युवराज शिंदे, पोलीस कर्मचारी नितीन कातुर्डे, अजय कामठे, सुभाष मोरे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×