एरंडवण्यात दुचाकीस्वार चोरट्यांचा धुमाकूळ; ज्येष्ठ महिलेचे दोन लाखांचे मंगळसूत्र लंपास
marathinews24.com
पुणे – दुचाकीस्वार ज्येष्ठ महिलेचे दोन लाख रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना एरंडवणे भागातील पटवर्धन बागेत घडली. याप्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुण्यात नशेसाठी इंजेक्शनचा वापर, ५ जण अटकेत – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला कर्वेनगरमधील मधुसंचय सोसायटीत राहायला आहेत. त्या रविवारी (२६ जुलै) सकाळी साडेआठच्या सुमारास एरंडवणे भागातील पटवर्धन बाग परिसरातून दुचाकीवरुन निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दोन लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे दुचाकीवरुन पसा झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या चोरट्याचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक सूरज राऊत तपास करत आहेत.






















