ज्येष्ठ महिलेचे दोन लाखांचे मंगळसूत्र हिसकावले
marathinews24.com
पुणे – सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ९ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना माॅ़डेल काॅलनीत घडली.
याबाबत एका डाॅक्टरांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्येष्ठ महिलेचे दोन लाखांचे मंगळसूत्र हिसकावले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७३ वर्षीय डाॅक्टर आणि कुटुंबीय हे माॅडेल काॅलनीतील लकाकी रस्त्यावर असलेल्या एका सोसायटीत राहायला आहेत. सदनिका बंद करुन ते बाहेर गेले होते. शनिवारी (२५ जुलै) मध्यरात्री चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाटात ठेवलेले डिजिटल लाॅकर तोडून चोरट्यांनी ९ लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक अमर काळंगे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.
शहर परिसरात सदनिकेचे कुलूप तोडून ऐवज लांबविण्याच्या घटना वाढल्या आहेत. बिबवेवाडी भागात सदनिकेचे कुलूप तोडून १९ लाख रुपयांचे दागिने चोरुन नेण्याची घटना नुकतीच घडली.



















