मॉडेल कॉलनीतील बंद सदनिकेवर चोरट्यांचा डल्ला; ९ लाखांचे दागिने लंपास
marathinews24.com
पुणे – खासगी विद्यार्थी वसतिगृहातून एकाचा लॅपटाॅप चोरून नेण्याची घटना शनिवार पेठेत घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
माॅडेल काॅलनीत घरफोडी; ९ लाखांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा शनिवार पेठेतील श्री अमृतेश्वर मंदिर परिसरात असलेल्या एका खासगी विद्यार्थी वसतिगृहात (पीजी) राहायला आहे. वसतिगृहातील खोलीचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्याने ४० हजार रुपयांचा लॅपटाॅप चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली. वसतिगृहात चोरी करणारा चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस हवालदार मुंढे तपास करत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत खराडी भागातील एका वसतिगृहातून तरुणीची ५० हजार रुपयांची सोनसाखळी चोरट्याने लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत तरुणीने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदर पाटील तपास करत आहेत.
वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात घडली. योगेश शिंदे (वय ३५, रा. शिंदे वस्ती, वाडेगाव, ता. हवेली) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे अपघात आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी जखमी झाला आहे. याबाबत योगेश शिंदे यांची पत्नी माया (वय ३०) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,११ जुलै रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास दुचाकीस्वार योगेश शिंदे आणि त्यांचा मित्र अष्टापूर फाट्याकडून वाडे बोल्हाईकडे निघाले होते. त्या वेळी भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार शिंदे हे गंभीर जखमी झाले. दुचाकीवरील त्यांचा मित्र किरकोळ जखमी झाला. शिंदे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.























