Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

आषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

आषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

एलईडी व्हॅन, मोबाईल सेफ्टी क्लिनिकद्वारे सुरक्षित गॅस वापराबाबत जनजागृती

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या आषाढी वारी २०२६ दरम्यान एचपीसीएलच्या पुणे एलपीजी प्रादेशिक कार्यालयाने राबविलेल्या एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला लाखो वारकरी, स्थानिक नागरिक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावना – सविस्तर बातमी 

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि संत तुकाराम महाराज पालखी या दोन्ही पालख्यांसोबत एचपीसीएलची दोन एलपीजी सुरक्षा जनजागृती वाहने संपूर्ण वारी मार्गावर कार्यरत होती. या वाहनांवरील एलईडी स्क्रीनद्वारे मराठी भाषेत एलपीजी सुरक्षिततेवरील माहितीपट व जनजागृतीपर चित्रफिती सातत्याने प्रदर्शित करण्यात आल्या.

याशिवाय, मार्गावरील विविध शहरांमध्ये व गावांमध्ये एचपी गॅस वितरकांच्या सहकार्याने मोबाईल सेफ्टी क्लिनिक आयोजित करण्यात आले. या माध्यमातून सुरक्षित एलपीजी वापर, गॅस गळती प्रतिबंध, आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची खबरदारी तसेच प्रत्यक्ष सुरक्षा प्रात्यक्षिकांद्वारे नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. या अभियानाद्वारे हजारो वारकरी व नागरिकांपर्यंत थेट पोहोचून घरगुती एलपीजीचा सुरक्षित वापर, गॅस गळतीची ओळख आणि अपघात प्रतिबंधाबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली.

या अभिनव उपक्रमातून एचपीसीएलच्या पुणे एलपीजी प्रादेशिक कार्यालयाने सार्वजनिक सुरक्षा, ग्राहक जनजागृती आणि समाजहिताप्रती असलेली आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली. महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या धार्मिक यात्रेदरम्यान राबविण्यात आलेल्या या अभियानाचे वारकरी, स्थानिक नागरिक आणि एचपी गॅस वितरकांनी मोठ्या प्रमाणावर स्वागत व कौतुक केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×