Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

डिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

मैत्रिणीवरुन झालेल्या वादातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न

अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया याठिकाणाहून बोलत असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने जेष्ठ नागरिकाला तब्बल ११ लाख ५२ हजारांचा गंडा घातला आहे. तुमच्या विरोधात मनी लॉड्रींगची केस असून, अटक वॉरंट निघाले आहे. तुम्हाला डिजीटल अटक करता येउ शकते, असे सांगून ऑनलाईनरित्या फसवणूक केली आहे. ही घटना १६ ते २३ जुलै कालावधीत कोथरूडमध्ये घडली आहे. याप्रकरणी ८२ वर्षीय तक्रारदाराने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पुण्यात खासगी विद्यार्थी वसतिगृहातून लॅपटाॅप चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ८२ वर्षीय असून, कुटूंबियासह कोथरूड परिसरात राहायला आहेत. १६ जुलैला सायबर चोरट्यांनी त्यांना फोन करून डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया याठिकाणाहून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्याविरूद्ध मनी लॉड्रींगची केस झाली असून, तुम्हाला डिजीटल अरेस्ट होउ शकते, अशी भीती त्यांना घातली. त्यानंतर सायबर चोरट्याने फिर्यादीकडून बँकखाते तपासणीच्या नावाखाली गोपनीय माहिती घेतली. त्यांच्या बँकखात्यातून ११ लाख ५२ हजारांची रक्कम वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक स्मिता पाटील तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×