Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

बँकॉकमधून पुण्यात ६ कोटींच्या हायड्रोपोनिक गांजाची तस्करी

बँकॉकमधून पुण्यात ६ कोटींच्या हायड्रोपोनिक गांजाची तस्करी

६ किलोहून अधिक हायड्रोपोनिक गांजा जप्त – पिंपरी चिंचवडच्या एका प्रवाशाला अटक

marathinews24.com

पुणे – शैक्षणिक हब असलेल्या शहरात आंतराष्ट्रीय पातळीवरून अमली पदार्थाची तस्करी होत असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहे. पुणे कस्टम विभागाने नुकताच बँकाँकहून पुण्यात तस्करी होत असलेला सुमारे ६ कोटी रूपयांचा तब्बल ६ किलो १४४ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. चोरट्या मार्गाने हा गांजा पुणे विमानतळावर आणल्याचा प्रकार पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क विभागाने (कस्टम) उघड करत प्रवाशाला बेड्या ठोकल्या आहेत. अतुल सुशिल हिवाळे (४३, रा. पिंपरी-चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार कारावाई करण्यात आली आहे. कस्टम विभागातील एअर इंटेलिजन्स युनिटच्या पोलिस निरीक्षक पलक यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मैत्रिणीला त्रास देत असल्याचा आरोप, अल्पवयीनाला बेदम मारहाण – सविस्तर बातमी 

अतुल हिवाळे हा दि. ५ ऑगस्टला इंडिगोच्या बॅकाँकहून आलेल्या विमानाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी साडेसहा वाजता उतरला. विमानतळावरील एअर इंटेलिजंस विभागाने संशयीतरित्या हालचालीवरून हिवाळेची तपासणी केली. त्याच्याकडील स्कायबॅग ट्रालीमध्ये दोन फर बॅग्ज आढळून आल्या. त्याधम्ये व्हॅक्युम सील केलेली १२ पॅकेट्स सापडली. त्या पॅकेटमध्ये हिरवट रंगाचा सुकवलेला पदार्थ होता. त्याला तिव्र वासही येत होता. प्राथमिक चाचणीत तो पदार्थ हा हायड्रोपोनिक वीड (गांजा) अमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. या गांजाचे वजन केले असता ६ किलो १४४ ग्रॅम गांजा होता. याप्रकरणी अटक आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता कस्टम विभागाच्या वतीने विशेष सरकारी वकील ऋषीराज वाळवेकर यांनी बाजु मांडली. आरोपीला न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पुण्यात विमानतळावरून आंतराष्ट्रीय स्तळावरील गांजाची तस्करी उघड झाल्याने कस्टम विभागाची सतर्कतेमुळे हा ६ किलो १४४ ग्रॅम गांजा पकडला गेला. या गांजाची आंतराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. तसेच उच्च प्रतिचा आणि उच्चभ्रू महागड्या वर्तुळात वापरला जातो. त्याची किंमत कोट्यवधी रूपयांची आहे. – ऋषीराज वाळवेकर, विशेष सरकारी वकील, कस्टम विभाग पुणे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×