Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

मैत्रिणीला त्रास देत असल्याचा आरोप, अल्पवयीनाला बेदम मारहाण

मैत्रिणीला त्रास देत असल्याचा आरोप, अल्पवयीनाला बेदम मारहाण

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल

marathinews24.com

पुणे – मैत्रिणीला त्रास देत असल्याचा आरोप, अल्पवयीनाला बेदम मारहाण – मैत्रिणीला त्रास देत असल्याची बतावणी करीत आरोपींनी अल्पवयीन मुलाला गाडीत बसवून नेत बेदम मारहाण केली आहे. ही घटना ४ ऑगस्टला दुपारी सव्वा एकच्या सुमारास वारजेतील मॉडर्न ज्युनिअर कॉलेजसमारे घडली आहे. याप्रकरणी आरोपी पृथ्वीराज शरद शिंदे (वय २० रा. नेरे, मुळशी ) अटक करण्यात आली आहे. १७ वर्षीय अल्पवयीनाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

दुचाकीचा धक्का लागल्याने पिस्तुलातून गोळीबार, ६ जण अटकेत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अल्पवयीन मुलगा कॉलेजमध्ये शिक्षण घेतो. आरोपी पृथ्वीराज आणि त्याचा साथीदाराने त्यांच्या मैत्रिणीला तक्रारदार अल्पवयीन त्रास देत असल्याचे कारणावरून मोटारीतून अपहरण केले. त्याला बेदम मारहाण करीत गायब करण्याची धमकी दिली. मैत्रिणीला जर त्रास दिला तर गायब करण्याची धमकी दिली. १५ ते २० मिनीटांनी आरोपींनी गाडीतून बाहेर ढकलून देत पसार झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी पृथ्वीराज शिंदे याला पोलिसांनी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन नाईकवाडे तपास करीत आहेत.

जादा परताव्याचे आमिष पडले २३ लाखांना

शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एकाची २३ लाख ६५ हजारांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. ही घटना डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ कालावधीत घडली. याप्रकरणी माळवाडी परिसरात राहणार्‍या एकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक व विविध बँक धारकांविरूद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे माळवाडीत राहायला असून, १५ डिसेंबर २०२४ रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क केला. शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याची बतावणी त्यांना केली. त्यांचा विश्वास संपादित करून चोरट्यांनी १० मार्च २०२५ पर्यंत त्यांच्या बँकखात्यातून २३ लाख ६५ हजार रूपये वर्ग करण्यास भाग पाडले आहे. दरम्यान, परतावा न मिळाल्यामुळे फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करीत आहेत.

मांगडेवाडीत घरफोडी, पावणेतीन लाखांचा ऐवज चोरीला

बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख ८० हजारांचा ऐवज चोरून नेल्याच घटना २ ते ४ ऑगस्ट कालावधीत कात्रज परिसरातील मांगडेवाडीतील निसर्गलक्ष्मी रेसीडन्सीमध्ये घडली आहे. याप्रकरणी तरूणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मांगडेवाडीतील निसर्गलक्ष्मी रेसीडन्सीमध्ये राहायला आहेत. २ ते ४ ऑगस्ट कालावधीत ते घर बंद करून बाहरेगावी गेले होते. त्यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील कपाटातील सोन्या-चांदीचे पावणेतीन लाख रूपयांचे दागिने चोरून नेले आहेत. गावाहून आल्यानंतर तक्रारदाराला घरात चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×