Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

आईचे ऐकले असते तर…! विषारी दारूने घेतला एकुलत्या मुलाचा जीव

मोटारीच्या दरवाज्यावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुण्यातील विषारी दारू मृत्यूकांड

marathinews24.com

पुणे – दवाखान्यात चल,” अशी आई वारंवार विनवणी करत होती. मात्र, नेहमीप्रमाणे दारूची नशा झाली असेल, असे समजून सॅम्युअल लिंकम धैर्यम यांनी तिचे ऐकले नाही. काही तासांतच त्यांची प्रकृती गंभीर झाली. अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विषारी दारूच्या विळख्यात गेलेल्या सॅम्युअल यांच्या मृत्यूने एका वृद्ध आईचा आधार हिरावला, तर दिव्यांग मुलाच्या डोक्यावरून पित्याचे छत्र हरपले.

पुणे, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त जबाबदार-एस.एम मुश्रीफ यांचा आरोप – सविस्तर बातमी

सॅम्युअल लिंकम धैर्यम (वय ४९, रा. ससाणेनगर, साईबाबा मंदिराजवळ, हडपसर) हे आई आणि दिव्यांग मुलासह राहत होते. पत्नी त्यांच्यासोबत राहत नसल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

वृद्ध आईला मिळणाऱ्या पेन्शनवरच घराचा खर्च भागत होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही अत्यंत हलाखीची होती. नातेवाईकांच्या माहितीनुसार, सॅम्युअल यांना दारूचे व्यसन होते. २७ मे रोजी त्यांनी पांढरे मळा परिसरातून हातभट्टी दारू आणून प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना किरकोळ त्रास जाणवू लागला. मात्र, दारूच्या नशेमुळेच अस्वस्थता होत असावी, असे घरच्यांना वाटत राहिले. रात्री उशिरा त्यांच्या पोटात आणि शरीरात वेदना सुरू झाल्या. ते विव्हळत होते. वृद्ध आईने त्यांना उपचारासाठी जाण्याचा आग्रह केला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. घरच्यांनाही तो नेहमीच्या नशेचाच परिणाम असावा, असे वाटत राहिले. त्यामुळे वेळ निघून गेली. प्रकृती अधिकच खालावल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. विषारी दारूमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. सॅम्युअल यांच्या मृत्यूनंतर घरात शोककळा पसरली आहे. वृद्ध आईसमोर आता एकाकी आयुष्याचा प्रश्न उभा राहिला आहे. तर दिव्यांग मुलाच्या भवितव्याची चिंता कुटुंबीयांना सतावत आहे. विषारी दारूच्या एका घोटाने केवळ एका व्यक्तीचा जीव घेतलेला नाही, तर एका कुटुंबाचा आधारही हिरावून घेतला आहे.पांढरे मळा परिसरातील विषारी दारू प्रकरणात समोर येणारी प्रत्येक कहाणी वेदनादायी आहे. कोणाचे वडील गेले, कोणाचा मुलगा गेला, तर कोणाच्या मुलांच्या डोक्यावरून आधाराचे छत्र हरपले. सॅम्युअल धैर्यम यांची कहाणीही अशाच उद्ध्वस्त झालेल्या संसारांपैकी एक ठरली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×