बारामतीत तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसाठी लाच घेणारा मध्यस्थ गजाआड

पुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडले

सातबारा उताऱ्यावर नोंदणीसाठी १५ हजारांची लाच

marathinews24.com

पुणे – बारामतीतील निंबूत कार्यालयातील तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांच्या नावे शेतकऱ्याकडून १५ हजार रुपयांचा लाच घेणाऱ्या मध्यस्थाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. मध्यस्थाने तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांच्या नावे सुरुवातीला २० हजार रुपयांची लाच मागितल्याचे तपासात उघड झाले.

कल्याणीनगरमध्ये अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू – सविस्तर बातमी

सोमनाथ संपत महानवर (वय ३५, रा. गडदरवाडी, खंडोबाची वाडी, ता. बारामती, जि. पुणे ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. महानवर याच्या विरुद्ध बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनयमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका शेतकऱ्याने तक्रार दिली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शेतकरी आहेत. तक्रारदाराची बारामतीतील निंबूत परिसरात सहा गुंठे जमीन आहे. बारामतीतील भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी करण्यात आली आहे. जमिनीची फाळणी केल्यानंतर सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तहसीलदारांनी पत्र दिले होते. तक्रारदार हे निंबूत येथील तलाठी कार्यालयात गेले. तेव्हा कार्यालयात वावरणारा मध्यस्थ सोमनाथ महानवर याने सातबाऱ्यावरील एका नोंदीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये २० हजार रुपये तलाठी जयश्री तनपुरे, मंडल अधिकारी मोहिते यांना द्यावे लागतील, असे सांगितले. शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीची एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून पडताळणी करण्यात आली. तेव्हा मध्यस्थ महानवर याने तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांच्या नावे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

३ मार्च रोजी तक्रारदाराने महानवर याच्याकडे विचारणा केली. तेव्हा चार गुंठे जमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंदणी करण्यात आली असून, पैसे पाठवा, असा संदेश तक्रारदाराला महानवर याने पाठविला. त्यानुसार बुधवारी (४ मार्च) बारामती – नीरा रस्त्यावर खंडोबाची वाडी येथे ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी सापळा लावला. तडजोडीत तक्रारदाराकडून १५ हजारांची लाच घेणाऱ्या महानवर याला पकडण्यत आले. चौकशीत महानवर हा तलाठी कार्यालयातील कर्मचारी नसल्याचे उघड झाले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×