Breking News
पुण्यात पार्किंगमध्ये गाडी लावताना तरुणावर गोळीबार, तिघांना अटकदातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी; एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादनकसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडीपुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरारश्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष! हर्षवर्धन फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात कलाकारांची मांदियाळीशेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारराज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा – महापौरसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा; महापौर मंजूषा नागपुरेमहिला पोलिसांसाठी स्वतंत्र समुपदेशन व मदत यंत्रणा उभारावी : डॉ. नीलम गोऱ्हे

एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाहा व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्ते व वाहतूक सुविधांच्या कामांना गती देण्याच्या सूचना

marathinews24.com

पुणे – चाकण औद्योगिक क्षेत्र परिसरातील कंपनीच्या स्थलांतराच्या अनुषंगाने तसेच औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाहा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आज चाकण औद्योगिक क्षेत्रातील विविध रस्त्यांची संयुक्त पाहणी केली. यावेळी एमआयडीसी अंतर्गत रस्ते, तळेगाव-चाकण महामार्ग तसेच पुणे-नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रिस्तरीय बैठकीत सकारात्मक चर्चा – सविस्तर बातमी

चाकण औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांची पाहणी करताना रस्त्यांवरील आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाहा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ज्या ठिकाणी रस्त्यांचे काँक्रिटीकरण अपूर्ण आहे, त्या ठिकाणी उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत. कामे करताना औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक विस्कळीत होणार नाही, यासाठी वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

टप्पा क्रमांक पाचमधील रस्त्याचे काम गतीने पूर्ण करण्याच्या सूचना

चाकण औद्योगिक क्षेत्रातील टप्पा क्रमांक पाचमध्ये कॉर्निंग कंपनीपासून पुणे-नाशिक महामार्गाकडे जाणाऱ्या उर्वरित रस्त्याच्या कामाचीही पाहणी करण्यात आली. या रस्त्याच्या कामात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी व समस्यांचे निराकरण करून काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. आवश्यक त्या ठिकाणी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या स्तरावरून आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देण्यात येईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक व्यवस्थेला मोठी मदत होणार असून, कंपन्यांची वाहतूक तसेच मालवाहतूक अधिक सुलभ होण्यास हातभार लागणार आहे. त्यामुळे प्रलंबित बाबींचे तातडीने निराकरण करून कामाला गती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

तळेगाव-चाकण महामार्गाच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना

तळेगाव-चाकण महामार्गावरील खराब रस्त्याच्या स्थितीचीही पाहणी करण्यात आली. रस्त्याची दुरवस्था लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. रस्त्यावरील खराब भागांची तातडीने दुरुस्ती करून वाहतुकीसाठी रस्ता सुरक्षित व सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

चाकण परिसरातील वाढती औद्योगिक वाहतूक लक्षात घेता रस्त्यांची गुणवत्ता आणि वाहतूक व्यवस्थेतील अडथळे दूर करणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही यावेळी सांगण्यात आले.

चाकण चौकात उद्योजक व औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा

पाहणीनंतर चाकण चौक येथे चाकण कृती समितीचे सदस्य, उद्योजक तसेच विविध औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधा तसेच कंपन्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत प्रतिनिधींनी आपली मते व अडचणी मांडल्या.

उद्योग क्षेत्राच्या सुरळीत कामकाजासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांबाबत प्राप्त झालेल्या सूचनांची संबंधित विभागांच्या माध्यमातून दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाहा आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

चाकण औद्योगिक क्षेत्र हे राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असून, येथील उद्योग, कामगार आणि मालवाहतूक यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस आणि औद्योगिक संघटनांनी परस्पर समन्वयाने काम करण्यावर यावेळी भर देण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×