गुंतवणुकीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप
marathinews24.com
पुणे – Investment Fraud Pune : गुंतवणुकीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सिंहगड रोड परिसरातील एका व्यक्तीची २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुंतवणुकीचा नफा आणि पैसे परत मिळण्याबाबत खोटे स्क्रीनशॉट दाखवून रक्कम घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी विनीत भोमे आणि पल्लवी भोमे (पुणे) यांच्यावर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संकेत दिलीप येवलेकर (पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
मालकीची नसलेली थार गाडी विकण्याचे सांगून ७ लाख ६० हजार उकळले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३१ जानेवारी ते दि. ११ मे २०२६ या काळात सिंहगड रोड परिसरात हा प्रकार घडला. कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी आरोपींनी वेगवेगळी आमिषे दाखवून फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने पैसे घेतले. (Investment Fraud Pune) गुंतवणुकीवर २० लाख रुपयांचा नफा झाल्याचे स्क्रीनशॉट दाखवले; मात्र रक्कम खात्यात जमा केली नाही. चेक दिल्यानंतरही ते वटले नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणातील विशिष्ट वेळ नोंदीत दिलेली नाही.




















