खराडी भागात फ्लॅटमधून २ लाखांचे दागिने चोरीला

मांजरीत १४ लाखांची घरफोडी; चोरट्यांवर गुन्हा

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – फ्लॅटमधून दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी दोन लाख १८ हजार रुपयांचे सोन्याचे दाागिने लांबविल्यचाी घटना खराडी भागातील एका सोसायटीत घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अटकेच्या भीतीने प्राचार्यांकडून खंडणी उकळणारे तीन पोलीस बडतर्फ – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे खराडीतील यशवीन ऑरीझोन सोसायटीत राहायला आहेत. त्यांचा सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरटे आत शिरले. शयनगृहातील कपाटातून दोन लाख १८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस कर्मचारी खरपुडे तपास करत आहेत. तक्रारदाराच्या सदनिकेत चोरी करणारा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे.

वृद्धाश्रमात चाेरी

लष्कर भागातील एका वृद्धाश्रमातून ७० हजार रुपयांची सोनसाखळी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर भागातील नेपीयर रस्ता परिसरात वृद्धाश्रम आहे. ज्येष्ठ महिलेने वृद्धाश्रमातील कपाटात सोनसाखळी ठेवली हाेती. चोरट्यांनी कपाटातून ७० हजार रुपयांची सोनसाखळी चोरून नेली. पोलीस कर्मचारी कुंभार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×