अटकेच्या भीतीने प्राचार्यांकडून खंडणी उकळणारे तीन पोलीस बडतर्फ

पुण्यात दंडात्मक कारवाईऐवजी पैसे उकळले दोन वाहतूक पोलीस निलंबित

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पुणे पोलीस दलातून निलंबित करण्याचे दिले आदेश

marathinews24.com

पुणे – बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) महाविद्यालयातील प्राचार्यांना अटक करण्याची भीती दाखवून ७ लाखांची खंडणी उकळणारे पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस शिपाई सोनाली हिंगे आणि सुदाम तायडे यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आले. पुणे पोलिसांच्या प्रशासन विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. उपनिरीक्षक बडे, हिंगे, तायडे यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघांना पुणे पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले होते.

पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआड – सविस्तर बातमी

गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघे जण पसार झाले असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. प्राचार्यांकडून खंडणी उकळण्यासाठी उपनिरीक्षक बडे, हिंगे, तायडे यांनी एका अल्पवयीन मुलीचा वापर केला. त्यांचे वर्तन गंभीर स्वरुपाचे आहे. प्राथमिक चौकशीत बडे, हिंगे, तायडे यांनी प्राचार्यांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळल्याचे उघडकीस आले, तसेच शैक्षणिक संस्थेची बदनामी करण्याची धमकी दिल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्यात आली. तिघांनी केेलेल्या कृत्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे. तिघे पसार झाले असून, ते विभागीय चौकशीला उपस्थित राहू शकले नाहीत. पसार झाल्यानंतर ते साक्षीदारांना धमकावू शकतात. पोलिसांवरचा विश्वास वाढवा, यासाठी तिघांना पोलीस दलातून काढून टाकणे गरजेचे आहे. विभागीय चौकशी न करता मिळालेल्या अधिकारांनुसार तिघांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे, असे अतिरिक्त आयुक्त संजय पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दामिनी पथकातील पोलीस शिपाई सोनाली हिंगे ही पोलीस दलात ‘रिलस्टार’ म्हणून प्रसिद्ध होती. ती समाज माध्यमात चित्रफीत प्रसारित करायची. एका व्यायामशाळेत (जिम) हिंगेची अल्पवयीन युवतीशी ओळख झाली. तिला नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष तिने दाखवून जाळ्यात ओढले. त्यानंतर अल्पवयीन युवतीचा वापर करुन उपनिरीक्षक बडे, हिंगे, तायडे यांनी एका महाविद्यालयातील प्राचार्यांना धमकावनू सात लाखांची खंडणी उकळली होती. युवतीला महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला नाही. या मुलीने एका महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. तेथील प्रवेशही रद्द झाला. त्यानंतर युवतीने कुटुंबीयांसह पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. पोलिसांनी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना बोलावून घेतले. त्यांनी पोलिसांनी केलेल्या कृत्याची माहिती दिली. त्यानंतर प्राचार्यांनी तिघांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×