पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआड

स्वारगेट पोलिसांनी केली कारवाई

marathinews24.com

पुणे – देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. गुलटेकडी परिसरात ही कारवाई करण्यात आली. सौरभ भरत आवळे (वय २४, रा. ढोले मळा, डायस प्लाॅट, गुलटेकडी ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. आवळे सराईत आहे. गुलटेकडीतील ढोले मळा परिसरात तो थांबला होता. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस हवालदार दिनेश भांदुर्गे आणि सुजय पवार यांना मिळाली.

अपघातात मदतीचा बहाणा करुन तरुणीची सोनसाखळी लांबविली – सविस्तर बातमी

पोलिसांनी सापळा लावून आवळेला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस सापडले. आवळेने पिस्तूल का बाळगले, तसेच त्याने कोणाकडून पिस्तूल आणले ? यादृष्टने तपास करण्यात येत आहे.

स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास भारमळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अभिजित पाटील, उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, हवालदार दिनेश भांदुर्गे, सागर केकाण, हर्षल शिंदे, अश्रृबा मोराळे, प्रशांत टाेणपे, सुजय पवार, रमेश चव्हाण, सागर काळे, संग्राम किंद्रे यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×