Breking News
पुण्यात पार्किंगमध्ये गाडी लावताना तरुणावर गोळीबार, तिघांना अटकदातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी; एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादनकसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडीपुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरारश्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष! हर्षवर्धन फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात कलाकारांची मांदियाळीशेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारराज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा – महापौरसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा; महापौर मंजूषा नागपुरेमहिला पोलिसांसाठी स्वतंत्र समुपदेशन व मदत यंत्रणा उभारावी : डॉ. नीलम गोऱ्हे

अपघातात मदतीचा बहाणा करुन तरुणीची सोनसाखळी लांबविली

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.

अहिल्यानगर रस्त्यावरील घटना

marathinews24.com

पुणे – अपघातानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचा बहाणा करुन तरुणीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी लांबविल्याची घटना खराडी परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका तरुणीने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस असल्याची बतावणी करुन ज्येष्ठाला लुटले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २२ वर्षीय तरुणी वाघोलीतील केसनंद फाटा परिसरात राहायला आहे. मंगळवारी (५ मे) सकाळी नऊच्या सुमारास तक्रारदार तरुणी आणि तिची आई दुचाकीवरुन खराडी परिसरातून निघाल्या हाेती. खराडी परिसरात दुचाकी घसरल्याने दुचाकीस्वार तरुणी आणि तिच्या आईला दुखापत झाली. त्यावेळी तेथून निघालेल्या एका चोरट्याने तरुणी आणि तिच्या आईला मदत करण्याचा बहाणा केला. प्रथमोपचार करण्यासाठी खराडीतील खासगी रुग्णालयात दाखल करतो, असे चोरट्याने सांगितले. चोरट्याने एक रिक्षा थांबविली. रिक्षा चालकाला एका खासगी रुग्णालयात रिक्षा नेण्यास सांगितले. चोरटा तरुणी आणि तिच्या आईसोबत रिक्षात होता.

तरुणीचे लक्ष नसल्याची संधी साधून त्याने तिच्या गळ्यातील ३० हजारांची सोनसाखळी लांबविली. तरुणी आणि तिच्या आईला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरटा पसार झाला. या घटनेची माहिती तरुणीने पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे. हवालदार खरपुडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×