Breking News
पुण्यात पार्किंगमध्ये गाडी लावताना तरुणावर गोळीबार, तिघांना अटकदातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी; एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादनकसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडीपुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरारश्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष! हर्षवर्धन फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात कलाकारांची मांदियाळीशेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारराज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा – महापौरसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा; महापौर मंजूषा नागपुरेमहिला पोलिसांसाठी स्वतंत्र समुपदेशन व मदत यंत्रणा उभारावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पोलीस असल्याची बतावणी करुन ज्येष्ठाला लुटले

दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पोलीस असल्याची बतावणी करुन चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाकडील सोनसाखळी, अंगठी असा १ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना कर्वेनगर भागात घडली.

पर्वती परिसरात चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला – सविस्तर बातमी

याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे कोथरूड भागातील डहाणूकर काॅलनी परिसरात राहायला आहेत. ३ मे रोजी ते कर्वेनगर भागातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सकाळी सव्वानऊच्या सुमारास निघाले हाेते. त्यावेळी दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. पोलीस असल्याची बतावणी त्यांच्याकडे केली. या भागात ज्येष्ठांना लुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. तुमच्याकडील दागिने काढून ठेवा, अशी बतावणी केली.त्यानंतर चोरट्यांनी ज्येष्ठाकडील सोनसाखळी, अंगठी असा ऐवज कागदात बांधून ठेवण्याचा बहाणा केला. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी सोनसाखळी, अंगठी लांबविली. पोलीस उपनिरीक्षक भांबेरे तपास करत आहेत.

शहर परिसरात पोलीस असल्याची बतावणी करुन ज्येष्ठांकडील दागिने चोरून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. पौड रस्ता, पाषाण परिसरात दोन ज्येष्ठांकडील दागिने लांबविण्याची घटना नुकतीच घडली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×